माजी सैनिकाचा सुपुत्र राष्ट्रीय खेळात झळकला; कान्हाने मिळवले बॉक्सिंगमध्ये रौप्य पदक. ( महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती ) भद्रावती दि,२० :- येथील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयात कार्यरत असलेले माजी सैनिक श्री. मुकेश भावरकर यांचे सुपुत्र कान्हा मुकेश भावरकर याने राष्ट्रीय स्तरावर भद्रावतीचा नावलौकिक वाढवला आहे. केंद्रीय विद्यालय भद्रावतीचा विद्यार्थी असलेल्या कान्हा याने मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स स्टेडियम, झांसी (उत्तर प्रदेश) येथे पार पडलेल्या केंद्रीय विद्यालय संघटनेच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत (KVS National Games) बॉक्सिंग प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत हरियाणा, जम्मू आणि उत्तर प्रदेश या राज्यांच्या खेळाडूंवर मात केली. या घामाच्या आणि संघर्षाच्या लढतीनंतर त्याने सिल्वर मेडल जिंकले. ही कामगिरी करताना कान्हाने कठोर मेहनत, आत्मविश्वास आणि निर्धार यांचे उत्तम उदाहरण घालून दिले. आपल्या यशाचे श्रेय त्याने प्रशिक्षक, कोच तसेच आपल्या पालकांना दिले आहे. कान्हाच्या या यशाबद्दल संपूर्ण भद्रावती शहरातून त्याचे अभिनंदन आणि कौतुक होत आहे. अशा प्रकारच्या यशस्वी युवा खेळाडूंमुळे शहराचा गौरव वाढतो आहे. आगामी काळात कान्हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करेल, व तसेच आगामी स्पर्धांमध्ये तो सुवर्ण पदकासाठी झुंजार प्रयत्न करेल, अशी अपेक्षा आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0