सेलूत ‘महा रक्तदान संकल्प’ अभियानांतर्गत उद्या रक्तदान शिबीराचे आयोजन. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.)सेलू : दि.21राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेलूतील भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातील साईबाबा मंदिर सभा मंडप येथे मंगळवार 22 जुलै रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने ‘महा रक्तदान संकल्प’ हे समाजोपयोगी अभियान राबविण्यात येणार असून राज्यभरात भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाअंतर्गत सेलूतही रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात सहभागी होत अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी सेलू तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0