भाजप युवा मोर्चाच्या वतीने रविंद्रभाऊ शिंदे यांचा सत्कार; विविध मुद्द्यांवर झाली चर्चा. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.25 :- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नव-नियुक्त अध्यक्ष मा. रविंद्रभाऊ शिंदे यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या शिष्टमंडळाने सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला. हा सत्कार भाजयुमोचे प्रदेश सचिव इम्रान खान यांच्या नेतृत्वात करण्यात आला. यावेळी मा. शिंदे यांना आगामी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्यासोबत भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रवीण सातपुते यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध सामाजिक, आर्थिक तसेच युवकांशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. या प्रसंगी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीपाद भाकरे, शहर महामंत्री योगेश खोब्रागडे, तसेच चेतन स्वान, तौसिफ शेख, शिवा कवायतदार, शहर संघटक राकेश खुसपुरे, स्वप्निल डांगे, अमर महाकुलकर, राजेश कांबळे, विकास सुकारे, मनोज अष्टणकर, सतिश अष्टणकर, राहुल असूतकर, अश्विन सिद्धमशेत्तीवर, केतन तिडके, वैभव असेकर, प्रफुल चमाटे, अतिश मांढरे, शक्ती गौरकर, स्वप्नील कोसरे, गुलशन अष्टणकर, धनु निवळकर, मोनिश आत्राम, विकास पिंपळकर, जीवन आडेकर, शाहिद शेख, शंकर चट्टे, अझीम पठाण आदी भाजयुमोचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0