मौजे हरनाळी ग्रामपंचायत कार्यालयाची चौकशी करा अन्यथा आमरण उपोषण-समजसेवक हणमंत शिंदे . (मारोती एडकेवार नांदेड/प्रतिनिधी )नांदेड: मौजे हरनाळी- ममदापूर गट ग्रामपंचायत, येथील दलित वस्ती मध्ये पिण्याच्या पाण्याची त्रिव टंचाई निर्माण झाली आहे. यासाठी गेल्या सात महिन्यापूर्वी अर्ज, देऊन ही आजपर्यंत कुठलीच कारवाई केली नसल्यावरून, दिनांक 25/7/025 रोजी हरनाळी ग्रामपंचायत कार्यालय, हरनाळी व ममदापूर येथे आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन, माननीय समाजसेवक हनुमंत शिंदे यांनी मुख्याधिकारी नांदेड जिल्हा परिषद यांच्याकडे देण्यात आले आहे, हरनाळी येथे दलित वस्तीची लोकसंख्या 200 ते 250 असून 25 घराची वस्ती आहे, तरी गावातील ग्रामपंचायत कार्यालयाचे विद्यमान सरपंच, दलित वस्तीमध्ये जाणून बुजून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करीत नाहीत, याविषयी दलित समाजातील कार्यकर्ते बऱ्याच वेळेस निवेदन देऊन, सुद्धा आजपर्यंत काही बदल दिसून आलेले नाही, सरपंच यांना विचारणा केल्यास, गुंडगिरीची भाषा बोलत आहेत. अरे तुरीची भाषा बोलून,तुम्ही जास्त शहाणे झाले का तुम्हाला काय करायचं ते करा, असे धमकी देण्यात येत आहे.दलित वस्तीमध्ये पाण्याची खूप मोठ्या प्रमाणे टंचाई जाणवत आहे, म्हणून मुख्य अधिकारी यांना, निवेदन देऊन हरनाळी ग्रामपंचायत कार्यालयाची,आजपर्यंत कोणत्याच प्रकारचे कारवाई झाली नाही, यासाठी गट विकास अधिकारी संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा,याविषयी अनेक वेळा निवेदन देऊन, सुद्धा गटविकास अधिकारी सुद्धा याकडे लक्ष देत नाहीत, भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर या भारताला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून,सर्वसामान्य माणसाला या देशांमध्ये या गावांमध्ये या शहरांमध्ये वावरात असताना कोणी पिण्याच्या पाण्यासाठी जाणून बुजून जर असे कार्य करत असेल, तर त्यांच्यावर ती कार्य कारवाई होणे हे संविधान सांगत आहे, हरनाळी येथे दलित वस्तीमध्ये दाम दुमटीने पाण्याची सोय होत नसल्याबद्दल,या कार्यकर्त्यांनी सदर मुख्य अधिकारी नांदेड जिल्हा परिषद यांच्याकडे निवेदनानुसार तक्रार दाखल केली आहे. यावरती सरपंच व गटविकास अधिकारी या सर्वांवरती मुख्याधिकारी कारवाई करतील का हा प्रश्न आहे?
byMEDIA POLICE TIME
-
0