केसराळी येथे तब्बल 40 वर्षांनतर भरला पुन्हा आठवडी बाजार. ( आंनद करूडवाडे नांदेड़ बिलोली. प्रतिनिधी )बिलोली तालुक्यातील माळरानाच्या पायथ्याशी वसलेलं केसराळी हे गाव आहे. साधारणता 4 हजाराच्या वर केसराळी गावाची लोकसंख्या आहे.गेल्या 2 ते 3 दशकाच्या काळात गावात कापड दुकान, किराणा दुकान, कृषी सेवा केंद्र, परवाना असलेलं देशी दारूचे दुकान व तसेच चार ते पाच ठिकाणी व्हिडिओ होती.गावाच्या पश्चिम दिशेला सॉ मिल (आरामशीन ) मिरची कांडप आदी व्यवसाय गावात चालत होती. त्यावेळी आजूबाजूच्या गावातील लोक खरेदीसाठी केसराळी गावात येत असत.त्यामुळे गावात गजबजलेलं वातावरण असायचं, केसराळी गावात गेल्या चाळीस वर्षापूर्वी रविवारी आठवडी भाजीपाल्याचा बाजार भरत होता असे आजही जुनी जानकर लोकं सांगतात.मात्र तब्बल 40 वर्षानंतर गावात दि. 20 जुलै रविवार रोजी पुन्हा आठवडी बाजार गावात भरविण्यात आला. त्यामुळे गावात अतिशय आनंदी व उत्साही वातावरण होते. पुन्हा ते भरभराटीचे दिवस गावाला येतील का?अशी चर्चा ही तरुणवर्गाकडून व गावातील नागरिकांतून होताना दिसून आली. गावात जरी गजबजलेलं वातावरण असले तरी बस थांबा परिसरात ओसाडपणा जाणवतो त्यामुळे या परिसरात प्रवाशी निवारा उभारावा अशी ही चर्चा रंगताना दिसून आली आहे.पिता पुत्र मिळून तीन वेळा बिलोली - देगलूर मतदार संघाचं नेतृत्व करणारे आमदार जितेश अंतापूरकर यांनी याकडे किती लक्ष देतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेलं.

केसराळी येथे तब्बल 40 वर्षांनतर भरला पुन्हा आठवडी बाजार.                                                                                      
Previous Post Next Post