मंत्र्याच्या वक्तव्याचा शिवा संघटनेच्या वतीने निषेध. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी )सेलू : राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय सिरसाट यांनी जगतज्योती क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वरांचा विधिमंडळ सभागृहात बोलताना केलेल्या ऐकेरी उल्लेखाचा अखिल भारतीय विरशैव शिवा संघटना तालुका शाखा सेलूच्या वतीने तहसिलदार नसल्याने नायब तहसीलदार विजय मोरे यांना निवेदन देऊन जाहिर निषेध करण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की संजय सिरसाटांनी महात्मा बसवेश्वरांचा ऐकेरी उल्लेख करून त्यांचा घोर अपमान केला आहे, त्यामुळे विरशैव समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत , त्यामुळे त्यांनी विरशैव समाजाची जाहिर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर उपजिल्हा प्रमुख शिवकुमार नावाडे, तालुकाध्यक्ष निजिलिंग आप्पा तरवडगे, शंकर राऊत , प्रकाश साखरे, अशोक मसुरे, सुजीत मिटकरी, कैलास स्वामी, बबन आप्पा झमकडे, गणेश केशरखाने, रामदास पाटील, दादाराव चौरे, सुनील नवघरे, गणेश सूर्यवंशी, सखाराम कानडे, विश्वनाथ साखरे, मनोहर चलोदे, देवराव चौरे, प्रकाश कोलीपाका, गुरबसआप्पा पंचगल्ले ,रामा कटारे आदी समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मंत्र्याच्या वक्तव्याचा शिवा संघटनेच्या वतीने निषेध.               
Previous Post Next Post