**मानवत येथे श्री संत सावता महाराज यांच्या 730 व्या पुण्यतिथी निमित्त श्रीमद् भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण व हरिपाठ पारायण सोहळ्याचे आयोजन.*. (मानवत / प्रतिनिधी.*)—————————*दि.16 जूलै ते 23 जुलै दरम्यान येथील संत श्रेष्ठ श्री संत सावता महाराज रथाकृती मंदिरातील भव्य सभा मंडपात संतश्रेष्ठ सावता महाराज यांच्या *730* व्या पुण्यतिथी निमित्ताने दि.16 जूलै ते 23 जुलै दरम्यान श्रीमद् भागवत कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामूहिक पारायण व हरिपाठ सामूहिक पारायणाचे आयोजन धार्मिक वातावरणात संपन्न होणार आहे. श्रीमद् भागवत कथेच्या प्रवक्त्या माजलगाव निवासी ह.भ.प. संगीताताई कोरडे यांच्या मधुरमय अमृत व रसाळ वाणीतून कथेचा लाभ मिळणार असून या कथेचे यजमान *मा. मधुकरराव आत्मारामजी रासवे* व सौ. लता मधुकरराव रासवे हे आहेत .दिनांक 16 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरा पासून ते श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिरा पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या धार्मिक सोहळ्यातील दैनंदिन कार्यक्रम अशा प्रकारे आहे. सकाळी पहाटे 4 ते 6 काकडा भजन, 6 ते 11 ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामूहिक पारायण, दुपारी चार ते पाच महिलांच्या भजनाचे आयोजन. सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ,व रात्री 7 ते 10 श्रीमद् भागवत कथा होणार आहे. श्रीमद् भागवत कथेतील प्रसंग प्रसंगाचे वर्णन कथा खालील प्रमाणे आहे. दिनांक 16 जुलै रोजी श्रीमद् भागवत कथा महात्म्य,भक्ती ज्ञान वैराग्य उद्धार गोर्कण उपाख्यान विधि , दिनांक 17 जुलै रोजी नारद व्यास संवाद, परीक्षितीचा जन्म, ऋषीचा श्राप, राजा परीक्षिती शुक्राचार्य भेट,दिनांक 18 जुलै रोजी सति चरित्र, ध्रुर्व चरित्र, जडभरत चरित्र ,आजामीळ उपख्यानदिनांक 19 जुलै रोजी भक्त प्रल्हाद चरित्र, गजेंद्र उपाख्यान समुद्रमंथन कथा, सूर्यवंश वर्णन, राजा हरिश्चंद्र कथा, चंद्रवंश कृष्णजन्म, दिनांक 20 जुलै रोजी पूतना उद्धार, नामकरण सोहळा, कालिया मर्दन लीला, गोवर्धन धारण लीला दिनांक 21 जुलै रोजी श्री कृष्ण लीला, उद्धव गोपी संवाद, कंस वध, श्रीकृष्ण रुक्मिणी शुभविवाह, दिनांक 22 जुलै रोजी इतर विवाहाच्या कथा, कृष्ण रुक्मिणी संवाद, पौईंक राजा कथा, सुदामा चरित्र, उद्धव श्रीकृष्ण संवाद, स्वधाम गमन कथेची सांगता. दिनांक 23 जुलै रोजी मानवत शहरातून सकाळी सात ते 11 भव्य शोभायात्रा व दिंडी मिरवणूक नंतर 11 ते 01 या दरम्यान , अनंत श्री विभूषित 1008 परमपूज्य ह.भ.प. श्री महामंडलेश्वर स्वामी मनीषानंदजी पुरीजी महाराज यांचे काल्याचे किर्तन व नंतर पंचकोशितील भाविक भक्तांसाठी महाप्रसाद वाटप संपन्न होणार आहे. या विधिवत धार्मिक सोहळ्या मध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण ह.भ.प. भारतीताई महाराज यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे. तर हरिपाठ पारायण ह.भ.प. गूरूवर्य पं.पू. पंडित महाराज डाके यांच्या नेतृत्वा खाली संपन्न होणार आहे. या धार्मिक सोहळ्याचे व महाप्रसादाचे यजमान मानवत नगरीचे भाग्यविधाते आ. डॉ. अंकुशरावजी बालाजीराव लाड यांनी भूषविले आहे. या धार्मिक सोहळ्याचा मानवत शहरासह तालूक्याच्या पंचकोशितील भागवत प्रेमी भागवत भक्तांनी कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन मानवत तालूक्यातील व मानवत परिसरातील समस्त माळी समाज बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे.**

**मानवत येथे श्री संत सावता महाराज यांच्या 730 व्या पुण्यतिथी निमित्त श्रीमद् भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण व हरिपाठ पारायण सोहळ्याचे आयोजन.*.            
Previous Post Next Post