खिरोदा प्र,यावल ग्रामपंचायत चा भोंगळ कारभार नागरिकांच्या जीवाशी खेळ (खिरोदा प्रतिनिधी )रावेर तालुक्यातील खिरोदा प्र यावल येथील बेघर वस्ती येथील समाज मंदिरच्या बाहेर घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले गटारी तुडुंब भरल्या आहेत यामुळे जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरले आहे.अनेक दिवसापासून खिरोदा ग्रामपंचायतचे बेघर वस्तीतील होणाऱ्या समस्येमुळे ,बेघर वस्ती तसेच समाज मंदिराच्या बाहेर झालेल्या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून , साथीचे आजार पसरत असून,लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे .हा संपूर्ण प्रकार ग्रामपंचायत च्या पदाधिकाऱ्यांना माहिती असल्यावरही या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे आणि ग्रामसेवक, सरपंच पदाधिकारी ह्या आरोग्याच्या जबाबदारी पासुन हात झटकत आहे.तरी ग्रामपंचायत संबंधित प्रशासनाने तात्काळ साफसफाई न केल्यास गावकरी मिळून उपोषण करणार असल्याचे परिसरातील जनतेकडुन ऐकण्यास मिळत आहे.तरी संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी ताबडतोब या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या जनतेचे आरोग्य वाचवावे अशी रास्त स्वरुपाची मागणी गावकरी जनतेकडुन करण्यात आली आहे..
byMEDIA POLICE TIME
-
0