रावेर शहरातच घाणीचे साम्राज्य.लहान मुलांसह परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात..नगरपालिकेचा कानाडोळा (रावेर प्रतिनिधी) रावेर शहरात रसलपूर रोड दरम्यान जी नाली सरळ रोड वरून वाहत आहें अशा ह्या घाणीमुळे परिसरातील लहान मुलांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाला साफसफाई व डास फवारणी ची विणवणी करुन देखील अधिकारी वर्गासह कर्मचारी ह्या आरोग्या विषयीच्या जबाबदारी पासुन हात झटकत आहेत आणि रावेर शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळुन त्यांच्या भावना दुखावण्याचे काम नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी करीत असल्याचे परिसरातील जनतेकडुन बोलले जात आहे तरी या घाणीच्या साम्राज्य बाबत नगरपालिका यंत्रणेने तात्काळ दखल घ्यावी आणि साफसफाई लवकरात लवकर करण्यात यावी अशी रावेर वासियांची रास्त स्वरूपाची मागणी आहे. सद्ध्या स्थितीत पावसाळ्याचे दिवस असल्याने तात्काळ साफसफाई व फवारणी करावी.. परिसरातील जनतेचे घाणीपासुन आजार झाल्यास त्यांचे बरेवाईट झाल्यास नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये दिसत आहेत
byMEDIA POLICE TIME
-
0