यावल नगर परिषदच्या दुर्लक्षित कारभारामुळे सात महीन्यांपासुन खोदलेले खड्डयांमुळे होत आहे अपघात उमेश फेगडे.. ( यावल प्रतिनिधी (रविंद्र आढाळे ) येथील नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील फालक नगर परिसरातील यावल भुसावळ मार्गावर असलेल्या आयशानगर कॉलनीच्या वळणावरील खोदलेल्या खुड्डयांमुळे वाहनांचे अपघात होत असुन, नगर परिषदने तात्काळ हे खड्डे बंद करून रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे उमेश फेगडे यांनी केली आहे . यावल भुसावळ या राज्य मार्गावरील रोडाच्या कडेला आयशानगर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वळणावर पराग बोरोले यांच्या घरासमोर मध्यभागी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने गटारी स्वच्छ करण्याच्या नांवाखाली मागील सात ते आठ महीन्यांपासून दोन मोठमोठी खड्डे खोदुन ठेवली असुन, वळणावर असलेल्या या खड्डयांमुळे दुचाकी वाहनांचे मोठया प्रमाणावर वाहन कोसळुन अपघात होत आहे. यावल नगर परिषदच्या वतीने खड्डे बुजण्यासाठी होत असलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नकारता येत नाही तरी नगर परिषदचे मुख्याधिकारी यांनी तात्काळ या जिवघेण्या खुड्डयांना बुजण्याचे आदेशा द्यावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उमेश रेवा फेगडे यांनी प्रस्तुत प्रतिनिधी बोलतांना केली असुन , दोन दिवसा हे खड्डे न बुजल्यास आपण मुख्याधिकारी निशिकांत गवई यांची भेट घेणार असल्पाचे सांगितले आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0