*पर्यावरण संरक्षण साठी यावल येथील मॉडर्न इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये काढली वृक्ष दिंडी*. (यावल प्रतिनिधी (रविंद्र आढाळे)यावल येथील मॉडर्न इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये वृक्ष दिंडी मोठया आनंदात साजरी करण्यात आली.शाळेच्या संस्थध्यक्ष नीता ताई गजरे मॅडम यांच्या हस्ते वृक्ष पूजन करून कार्यक्रम सुरू करण्यात आला. या वृक्ष दिंडीत विदयार्थ्यांनी मोठया संख्येने सहभाग नोंदवून रॅली ची शोभा वाढवली. तसेच विदयार्थ्यांनी झाडें लावा झाडें जगवा, एक मूल एक झाड, झाडें लावा जीवन वाचवा, कावळा करतो काव काव माणसा माणसा एक तरी झाड लाव अशी घोषणा देऊन गावकरी लोकांना संदेश दिला.वृक्ष दिंडी, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जनजागृती करण्याचा एक महत्वाचा उपक्रम आहे. दिवशी शाळेच्या शिक्षिका मंगला पाटील यांनी झाडांचे चे महत्व विदयार्थ्यांना पटवून दिले या प्रसंगी शाळेच्या संस्थाध्यक्ष निताताई गजरे, मुख्याध्यापिका जयश्री चौधरी, तसेच शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

*पर्यावरण संरक्षण साठी यावल येथील मॉडर्न इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये  काढली वृक्ष दिंडी*.                              
Previous Post Next Post