**के. के. एम. महाविद्यालयात आज करीअर कट्टाचे उद्घाटन*महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित. (मानवत / वार्ताहर )जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा चे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने मा. श्री यशवंत शितोळे साहेब, अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या हस्ते होणार आहे. ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रास्ताविक मा.प्राचार्य डॉ. धनंजय तळणकर,अध्यक्ष राज्यस्तरीय करिअर संसद समिती, अध्यक्षीय मनोगत मा. प्राचार्य डॉ. श्री कुमार महामुनी,सदस्य राज्यस्तरीय करीअर संसद समिती, आणि आभार डॉ. एच.डी देशभ्रतार सचिव, राज्यस्तरीय करिअर संसद समिती,या मान्यवरांच्या हस्ते हा कार्यक्रम यशस्वी होणार आहे. महाविद्यालयीन स्तरावर संस्थेचे अध्यक्ष श्री.विजयकुमार कत्रुवार, सचिव श्री बालकिशन चांडक इतर सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे, उपप्राचार्य डॉ के. जी हुगे, करिअर कट्टाचे समन्वयक डॉ पंडित लांडगे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे प्रास्ताविक करतील,कट्टाचे समन्वय डॉ. पंडित मोरे लांडगे हे विद्यार्थ्यांना शपथ देतील. महाराष्ट्र राज्य करिअर कट्टा अंतर्गत महाविद्यालयीन स्तरावर करियर संसदेची निवड करण्यात आली असून या करिअर संसदेत मुख्यमंत्री म्हणून कु. पायल शिवाजी वाघमारे, नियोजन मंत्री, कु. प्रतीक्षा राधाकिशन जाधव, कायदे व शिस्त पालन समिती मंत्री कु. दिशा शिवाजी पाईकराव,सामान्य प्रशासन मंत्री कु.भाग्यश्री भोरकडे,माहिती व प्रसारण मंत्री, श्रीराम नारायण तरंगे, उद्योजकता विकास मंत्री, कु. कैलास प्रभाकर तळेकर, रोजगार व रोजगार मंत्री कु. पवन सुभाष निर्वळ,कौशल विकास मंत्री कु.प्रीती संजय उपाडे, संसदीय कामकाज मंत्री कु. वैष्णवी अरुण भोसले, माहिती व बालकल्याण मंत्री कु.हर्षदा दलित मुळे आणि सदस्य म्हणून कु. सोनाली महादेव देवर्षी यांना पदाची आणि गोपनियतेची शपथ देऊन नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. युवकांच्या करिअरला दिशा देण्यासाठी तसेच युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासन, राज्य शासन, विद्यापीठ, महाविद्यालय व वेगवेगळ्या माध्यमातून जे जे उपक्रम राबवणे आवश्यक आहे.ते सर्व उपक्रम राबवण्यासाठी एम पी एस सी, यू पी एस सी, पोलीस भरती, आर्थिक करिअर उद्योजकता, आयएएस आपल्या भेटीला, उद्योजक आपले भेटायला, स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी राज्यपातळीवरील स्पर्धा परीक्षा तयारी,बँकिंग सेवा, स्टाफ सिलेक्शन कमिशन, केंद्रीय पातळी स्पर्धा परीक्षा, एवढेच नव्हे तर एकूण एक हजार दिवस सातत्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या एकंदरीत विकासाला चालणा देण्यासाठी, स्वतःच्या पार उभे राहण्यासाठी,रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वागीन विकास आणण्यासाठी या करिअर कट्ट्याचा उद्देश असून त्याचा निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या विकासाला चालना देणारा हा करिअर कट्टा आहे. त्यामुळे महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेल्या दिसून येतो. या करिअर कट्टाच्या माध्यमातून नकीच फायदा होईल.***

**के. के. एम. महाविद्यालयात आज  करीअर कट्टाचे उद्घाटन*महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित.                                                                    
Previous Post Next Post