स्मशानभूमीच्या जागेवरून गावकरी आपापसात भिडले स्मशानभूमीच्या जागेवरून दोन गावात प्रचंड वाद झाल्याचे आज पाहण्यास मिळाले आहे. यात मनूर गावात एकाच मृत्यू झाल्याने अंत्यविधी करण्यास आलेल्या ग्रामस्थांना संगम गावच्या गावकऱ्यांनी गायरान जमिनीवर अंत्यविधी करण्यास विरोध केला. यामुळे दोन्ही ग्रामस्थांमध्ये वाद निर्माण होऊन हे गावकरी भिडले होते. यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.धर्माबाद तालुक्यातील मनुर आणि संगम या दोन गावातील ग्रामस्थांमध्ये हा वाद झाला. मनुर गावात स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने जवळच असलेल्या संगम या गावात स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे. परंतु ही जागा मनुरच्या गावकऱ्यांना स्मशानभूमीसाठी संगम गावचे गावकरी देण्यास तयार नाही. यामुळे मागील काही दिवसांपासुन दोन्ही गावात हा वाद आहे. दरम्यान मंगळवारी मनुर येथील एका व्यक्तीचेपोलीस बंदोबस्तात अंत्यविधीपोलिसांनी वाद मिटविला. यानंतर पोलीस बंदोबस्तात संगमच्या गायरान जमिनीवर अंत्यविधी पार पडला. परंतु महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान संगम या गावचे गावकरी संगम येथील गायरान जागा देण्यास तयार नाहीत. त्यामुळे अजून देखील या ठिकाणी प्रचंड तणाव असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.निधन झाले. त्या व्यक्तीचे अंत्यविधी करण्यासाठी मनुरचे गावकरी संगमच्या गायरान जमीन इकडे अंत्यविधी करण्यास जात असताना संगम गावच्या गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला. यावेळी दोन्ही गावचे गावकरी आपापसात भिडले. पोलिसांनी मध्यस्थी करत गावकऱ्यांमधील वाद मिटविला
byMEDIA POLICE TIME
-
0