**कस्तूबा गांधी बालिका विद्यालयाचे सांडपाणी रस्तावर ; सांडपाण्याची विल्हेवाट लावा शिवसेनेचे गणेश नाईक यांची मागणी.*. (मानवत / प्रतिनिधी.)मानवत येथील कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयाचे शौचालयाचे पाईपलाईन लिकिज झाल्यामूळे घाण विष्टामिश्रित सांडपाणी रस्त्यावर येत असल्यामुळे परिसरात दूर्गंधी पसरली आहे. प्रशासनाने तात्काळ पाहणी करून रस्त्यावरूण वाहणारार्या मलमिश्रित पाण्याचा बंदोबस्त करावा, नसता शिवसेनेच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा शिवसेनेचे सर्कल प्रमूख गणेश नाईक यांनी दिनांक १६ जूलै रोजी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.सविस्तर वृत्त असे की, कस्तुरबा गांधी बालिका विदयालयचे सांडपाणी वाहुन नेणारे पाईपलाईनची दुरुस्ती करणे बाबतचे निवेदन शिवसेनेचे सर्कल प्रमुख गणेश माणिकराव नाईक यांनी मानवत शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विदयालयातील स्वच्छता गृहाचे सांडपाणी वाहुन नेणारे पाईप लाईन लिकीज झाल्यामुळे सांडपाणी हे नेताजी सुभाष विदयालाच्या प्रांगणात जमा होत आहे. त्यामुळे शालेय मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निमार्ण होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्याची काळजी घेवून सांडपाणी वाहून नेणारे लिकिज दुरुस्त करावे यासाठी तोंडी कस्तुरबा गांधी विदयालय मुख्याध्यपकांना सांगुन तसेच गट शिक्षण अधिकारी यांना तोंडी कळविण्यात आले असून अदयाप पर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. शालेय विदयर्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल आंदोलन काळात काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास आपले लोक कल्याणकारी प्रशासन जबाबदार राहील. असा ईशारा शिवसेनेचे सर्कल प्रमूख गणेश माणिकराव नाईक यांनी दिला आहे..
byMEDIA POLICE TIME
-
0