नरळद येथील जल शुद्धीकरण केंद्र घाणीच्या विळख्यात**ग्राम विकास अधिकारी यांचे दूर्लक्ष. (*मानवत / प्रतिनिधी._)___मानवत तालुक्यातील मौ. नरळद येथील जल शुद्धीकरण केंद्र ( वॉटर प्लन्ट ) पूर्ण घाणीच्या विळख्यात असून ग्रामपंचायत प्रसासनाने या कडे लक्ष देऊन त्या ठिकाणची नियमित स्वच्छता करावी अशी मागणी रणजीत तुपसमुंद्रे यांच्या वतीने ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. एकीकडे प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून नागरिकांना पिण्याचे पाणी स्वच्छ व शुद्ध उपलब्ध व्हावे या साठी जल शुद्धीकरण केंद्र ( वॉटर प्लन्ट) हा ग्रामपंचायत मार्फत उभारले आहे परंतु या ठिकाणी मोठया प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असून ठिक ठिकाणी कचऱ्याचे ढीगारे निर्माण झाले असून पूर्ण परिसरात अस्वछता निर्माण झाली आहे त्यामुळे जल शुद्धीकरण केंद्रच पूर्ण घाणीच्या विळख्यात असल्यामुळे या ठिकाणी मोठया प्रमाणात डासाची उत्पती होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ येथील ठिकाणाची नियमित स्वछता करून त्या ठिकाणी फरशी बस वण्यात यावी अशी मागणी यावेळी रंजित तुपसमुंद्रे यांनी केली आहे.***

नरळद येथील जल शुद्धीकरण केंद्र घाणीच्या विळख्यात**ग्राम विकास अधिकारी यांचे दूर्लक्ष.                         
Previous Post Next Post