बिलोली येथे छत्रपती राजेंना मोठ्या उत्साहात जल्लोषात पुष्पहार अर्पण (आंनद कुरूडवाडे जिल्हा ग्रामीण बिलोली प्रतिनिधि ) बिलोली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नाव समावेश केल्याबद्दल बिलोली शहराच्या वतीने शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झालेल्या यादीत महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी किल्ले आणि तमिळनाडूतील जिंजी या एका किल्ल्याचा समावेश आहे. या वेळी माजी नगराध्यक्ष विजयकुमार कुंचनवार भाजपा मंडळ अध्यक्ष इंद्रजित तुडमे, सामाजिक कार्यकर्ते सय्यद रियाज, बाजीराव पा. जाधव, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष चक्रधर पाटील टेकाळे, सुधाकर देसाई, नागनाथ वाडीकर भास्कर देवके शिल्लरत्न जाधव प्रशांत गादगे, गोविंद मिरकुरे पिराजी शेळके, रोशन तुडमे, साईप्रसाद तुडमे, मारुतीo, माधव बळवंते सुमित देवके आदी यावेळी उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0