**बालकाच्या आरोग्यासाठी आईचे दूध अनमोल**@) :- डॉ. आशेक शेख* *( वैद्यकिय अधिक्षक )*. (मानवत / प्रतिनिधी.)—————————जागतिक स्तनपान सप्ताहाच्या औचित्याने मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात महिलांसाठी विशेष स्तनपान जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशेक शेख यांनी केले.डॉ. आशेक शेख यांनी मार्गदर्शनात सांगितले की, “आईचे दूध हे बालकासाठी सर्वोत्कृष्ट व संपूर्ण आहार असून त्यात जीवनासाठी आवश्यक सर्व पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. जन्मानंतरच्या पहिल्या सहा महिन्यांत केवळ आईचे दूध देणे हे बाळाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.”यावेळी त्यांनी स्तनपानामुळे बाळाच्या शारीरिक व मानसिक विकासाबरोबरच रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हे अधोरेखित केले. तसेच मातेला होणारे आरोग्य फायदे, योग्य स्तनपान तंत्र, व समाजातील चुकीच्या समजुती दूर करण्याबाबतही सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाला रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी शेख आदिल , डॉ कलीम खान , आधिपरिचारिका शुभांगी जोशी बालिका सुरवसे रत्नमाला दाभाडे , रेणुका गिराम , करून ढेपे , आरोग्य कर्मचारी अकबर पठाण , राजू चिंदाले, बजरंग ढवळे, राजू पिंपळे आणि अनेक माता उपस्थित होत्या. शेवटी उपस्थित मातांनी आपल्या दैनंदिन जीवनात योग्य पद्धतीने व नियमितपणे स्तनपान करण्याची प्रतिज्ञा केली. कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि वातावरणात मातृत्वाचा स्नेह व आरोग्याची जाणीव अधिक दृढ झाली.***
byMEDIA POLICE TIME
-
0