लाचखोरीचा पर्दाफाश तहसिलदाराची कडक कारवाई , शेवटी...;इम्रान खान यांच्या लढ्याला यश..!आखिर अनिल गहूकर निलंबित.. (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.26:- तालुक्यातील विवादित तलाठी अनिल लक्ष्मण गहुकर यांना महसूल प्रशासनाने लाचखोरीच्या आरोपांनी निलंबित केले आहे. पिपरी (दे) येथील गहुकर यांनी शेतकरी वर्गाकडून लाच घेऊन कामे करण्याचा आरोप आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर भाजयुमोचे प्रदेश सचिव इम्रान खान यांनी याविरुद्ध लेखी तक्रार केली आणि महसूल प्रशासनाला कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. प्रशासनाने सुरुवातीला कारवाईत विलंब केला असला तरी शेवटी तलाठी गहुकर यांचा निलंबनाचा आदेश जाहीर करण्यात आला. तालुका प्रशासनाने अनिल गहुकर यांच्यावर तपासणी केली असता ग्रामीण महसूल अधिकारी म्हणून राबवले जाणारे कर्तव्य नीट पार पाडले नसल्याचे दफ्तरातील नोंदींवरून स्पष्ट झाले. त्यांनी साजा घोनाड तहसिल कार्यालयातून हटून वरोरा येथून येणे-जाणे केले, मार्च ते जुलै 2025 दरम्यान आवश्यक चलन भरलेले नव्हते आणि दौरा दैनंदिनी अद्ययावत ठेवण्याचाही त्यांचा अपक्रम होता. याशिवाय पिपरी (दे) गावकऱ्यांकडूनही मोठ्या प्रमाणावर तक्रारी मिळाल्या आहेत. प्रशासनाच्या पहाणीनुसार अनिल गहुकर यांनी शासकीय कर्तव्याकडे दुर्लक्ष केले असल्याचा निष्कर्ष निघाला. त्यानुसार उपविभागीय अधिकारी वरोरा यांनी निलंबनाची शिफारस केली आहे.या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 चे नियमानुसार अनिल गहुकर यांना तातडीने निलंबित करण्याचा आदेश तहसिलदार भद्रावती यांनी दिला आहे. निलंबनाच्या काळात त्यांचे मुख्यालय मुधोली तहसिल कार्यालय असेल आणि ते तहसिलदारांच्या संमतीशिवाय मुख्यालय सोडू शकणार नाहीत. निलंबन काळातील निर्वाह भत्ता तहसिलदार भद्रावती यांच्या देखरेखीखाली देण्यात येईल.वादविवादाच्या शेवटी, भाजयुमोचे पदाधिकारी इम्रान खान व श्रीपाद बाकरे यांनी जल टाकीवर चढून विरोध आंदोलन केले, ज्यामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलली. या कारवाईमुळे महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर आणि लोकसेवकांची जबाबदारी सांभाळण्याच्या अपेक्षांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

लाचखोरीचा पर्दाफाश तहसिलदाराची कडक कारवाई , शेवटी...;इम्रान खान यांच्या लढ्याला यश..!आखिर अनिल गहूकर निलंबित..                                                      
Previous Post Next Post