पोलीस स्टेशन हिंगणघाट दिनांक 31/10/2025लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे 150 व्या जयंती निमित्य पोलीस स्टेशन हिंगणघाट तर्फे वॉक फॉर युनिटी कार्यक्रम संपन्न.. भारताचे लोह पुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचे 150 व्या जयंतीचे औचित्य साधुन "एक कदम, एक देश की एकता और अखंडता के लिए" या उददेशाने श्री अनुरागजी जैन, पोलीस अधिक्षक, वर्धा, श्री सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधिक्षक, वर्धा, यांचे मार्गदर्शनात तसचे श्री सुशिलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांचे उपस्थितीत पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे तर्फे कॉटन मार्केट यार्ड, हिंगणघाट येथे दिनांक 31/10/2025 रोजी सकाळी 06.00 वाजाता "वॉक फॉर युनिटी" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास हिंगणघाट शहरातील प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग, शालेय विद्यार्थी, माजी सैनिक, गृह रक्षक दल, पोलीस पाटील, उद्योजक व व्यापारी वर्ग, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बंधु मोठ्या संख्येन सहभागी झाले होते. सदर कार्यक्रमाचे सुरवातीस अनुकुल वातावरण निर्माण होण्याचे दृष्टीन झुंमा डांसने सुरवात करण्यात आली. व त्यानंतर कार्यक्रमास उपस्थित जनसमुदाय कॉटन मार्केट येथुन शहरातील मुख्य मार्गाने तिन किलोमिटर पाई चालत अंतर पुर्ण करून कॉटन मार्केट येथे परत आले. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन सचिन खंदार यांनी केले. तसेच कार्यकमाची सांगता भारत देशाची एकता व अखंडता बाधित राखण्या करीता अगोदर प्रतिज्ञा घेवुन व तदनंतर राष्ट्रगिताने करण्यात आली. सदर कार्यक्रमाबाबत पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील ठाणेदार श्री अनिल राउत यांनी आभार प्रदर्शन केले. सदर कार्यक्रमांस हिंगणघाट शहरातील जनतेने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला व सदर कार्यक्रमांबाबत पोलीस विभागाचे सर्वत्र कौतुक केले.
byMEDIA POLICE TIME
-
0