पुलगावमध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा; 'वॉक फॉर युनिटी' रॅलीला चांगला प्रतिसाद!**. (वर्धा ग्रामीण प्रतिनिधी विपुल पाटील.)पुलगाव, ३१ ऑक्टोबर २०२५: लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त शहरात 'राष्ट्रीय एकता दिवस' साजरा करण्यात आला. पुलगाव पोलीस स्टेशनने आयोजित 'रन फॉर युनिटी एक भारत श्रेष्ठ भारत' रॅली सकाळी ६ वाजता पोलीस स्टेशन ते आर. के. हाय स्कूलपर्यंत काढली. पोलीस निरीक्षक यशवंतराव सोलसे, तहसीलदार स्नेहा क्षीरसागर, पोलीस स्टाफ, आयटीआय विद्यार्थी-शिक्षक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे गौरव मसूरकर, आर. के. हाय स्कूलचे सुशील बांगर व शिक्षक-विद्यार्थी, जिल्हापरिषद शाळेचे निवृत्त अंबादे सर आणि अनेक नागरिकांच्या उपस्थितीत रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.भारताचे पहिले गृह मंत्री आणि राष्ट्रीय एकतेचे प्रणेते सरदार वल्लभ पटेल यांना विनम्र अभिवादन अर्पण करत हा कार्यक्रम यशस्वी झाला.
byMEDIA POLICE TIME
-
0