७१ कोटी ५८ लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे आ. राजेश पवार यांच्या हस्ते भूमिपूजन.. महाअभियाना अंतर्गत धर्माबाद नगर परिषदेच्या ७१ कोटी ५८ लाख रुपयांचा पाणीपुरवठा योजनेचा बांधकाम शुभारंभ नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आ. राजेश पवार यांच्या हस्ते करण्यात आला आहे.धर्माबादनगर परिषदपाणीपुरवठाया योजनेस ऑक्टोबर २०२३ मध्ये तांत्रिक मान्यता मिळाली होती. दि. २९ ऑगस्ट २०२४ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. रुपये ७१ कोटी ५८ लक्ष गेल्या १४ महिन्यांपासून मान्यता असूनही शुभारंभ झाला नाही. दि. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. बांधकाम पूर्ण करण्याची मुदत दीड वर्षे आहे. गुजरात राज्यातील राजकोट येथील में. एल. एल. कन्ट्रक्शन कंपनीलाकाम दिलेले आहे. ही पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यास प्रत्येक व्यक्तीला १३५ लिटर पाणी मिळणार आहे. आठ हजार पाचशे कुटुंबांनानळ देऊन शंभर टक्के पाणी मिळणार आहे. या योजनेमुळे धर्माबादकरांना पाणीटंचाई होणार नाही असे या योजनेचे स्वरूप आहे.याप्रसंगी आ. राजेश पवार व मान्यवरांच्या हस्ते नगरोत्थान महा अभियानांतर्गत पाणीपुरवठा योजनेचे माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यातआले आहे. नगरपरिषदेच्या मैदानावर आयोजित सभेत मार्गदर्शन करताना आ. राजेश पवार म्हणाले, धर्माबाद शहराच्या विकासासाठी माझ्या मनात अनेक योजना आहेत. हे करून दाखवणारा व्यक्ती असून, पुणे-मुंबईच्या शहरासारख्या अनेक योजना आणणार आहे. त्यापैकी ही पाणीपुरवठा योजना एक आहे. धर्माबाद शहराचा विकास करायचा असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही उमेदवारी दिलेल्या भाजपच्या व्यक्तीला निवडून आणावे असे आवाहन केले.याप्रसंगी शास्त्री महाविद्यालयाचे सचिव डॉ. कमलकिशोर काकांणी, उपाध्यक्ष नागभूषण वर्णी, डॉ. विलास टोंगे, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष राम पाटील बाळापूरकर, या सर्व कार्यकत्यांनी धर्माबाद नगरपालिकेवर भगवाझेंडा फडकवावा, असे आवाहन केले आहे. याप्रसंगी नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली होती.कार्यक्रमास दताहरी पाटील चोळाखेकर, रमेश गौड, श्रीनिवास ईनानी, उमेश झंवर, गंगना वर्णी, रवींद्र पोतगंटीवार, गोवर्धन मालू, विठ्ठल पाटील चोळाकेकर, तालुकाध्यक्ष गुलाबराव पाटील, विजय राठोड, हणमंत पाटील मोकलीकर, मन्मथअप्पा स्वामी रोशनगावकर, संपादक बाबुराव पाटील आलूरकर, संपादक बाहयाखान, भोजराम गोणारकर यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन नायगाव विधानसभेचे अध्यक्ष विजय डांगे पाटील यांनी तर आभार शहराध्यक्ष अॅड. चक्रेस पाटील बन्नाळीकर यांनी मानले आहे. तालूका प्रतीनीधी सज्जन संतोष

 ७१ कोटी ५८ लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे आ. राजेश पवार यांच्या हस्ते भूमिपूजन..                                                                                              
Previous Post Next Post