**अंतर्गत वादामुळे पाडळसे ग्रामपंचायतीचे २ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या बदल्या विकासकामे ठप्प; १ कोटींचा निधी पडून****. (पाडळसे (ता. यावल) | वार्ताहर** - परिसरातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या पाडळसे येथे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांच्या अंतर्गत वादामुळे गावातील विकासकामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. केंद्र शासनाच्या १५ व्या वित्त आयोगातून नागरिकांच्या आरोग्य व मूलभूत गरजांसाठी प्राप्त झालेला **एक कोटी रुपयांहून अधिक निधी** या वादामुळे पडून आहे.या अंतर्गत वादामुळे ग्रामपंचायतीचा कारभार पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. वादातून दोन ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, (सी एच वाघमारे , विद्या सुर्यवंशी) पुरुष ग्रामपंचायत अधिकारी पाडळसे गावाचा अतिरिक्त पदभार स्विकाण्यास तयार नसतांना महीला ग्रामविकास अधिकारी विद्या सूर्यवंशी यांनी पाडळसे ग्रामपंचायत अतिरिक्त पदभार स्वीकारलेला असताना त्यांच्याकडे असलेला पाडळसे ग्रामपंचायती चा अतिरिक्त पदभार दि. १५ ऑक्टोंबर रोजी तडका फडकी काढून घेतल्याने पुन्हा एकदा पाडळसे गाव वाऱ्यावर सोडले असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये पसरली आहे . **वाद विकोपाला; अधिकारी लक्ष देण्यास कचरतात**सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांमधील वाद इतका विकोपाला गेला आहे की, गेल्या वर्षभरात या ग्रामपंचायतीत तीन अदखलपात्र गुन्हे, एक अॅट्रॉसिटीचा अर्ज आणि जिल्हा परिषदेसमोर उपोषण असे प्रकार घडले आहेत. या सततच्या वादावादीमुळे कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला पाडळसे ग्रामपंचायतीच्या कामकाजात लक्ष घालण्याची इच्छा होत नाही.**नागरिकांची मध्यस्थीची मागणी**पाडळसे गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ यांनी या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी जिल्हा परीषद कार्यकारी अधिकारी (CEO) यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO) यांनी तात्काळ मध्यस्थी करून सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांमधील वाद मिटवावा आणि हा पडून असलेला वित्त आयोगाचा निधी त्वरित विकासकामांसाठी उपयोगात आणावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.---
byMEDIA POLICE TIME
-
0