निधन वार्ता* ऑर्डनन्स फॅक्टरीचे सेवानिवृत कर्मचारी बबनरावजी देवगडे यांचे निधन भद्रावती दि.2:- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सदस्य तसेच दैनिक लोकशाही चे तालुका प्रतिनिधी निशांतभाऊ देवगडे यांचे वडील बबनरावजी देवगडे हे दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी स्वर्गवासी झाले. नागपूर येथील ओकार्ड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना दुपारी दोनच्या सुमारास अल्पशा आजाराने त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांचे अंत्यविधी आज दिनांक 2 नोव्हेंबर रोजी 11 वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणाऱ्या अंत्ययात्रेनंतर पिंडोनी स्मशानभूमी येथे पार पडणार आहेत.बबनरावजी देवगडे हे ऑर्डनन्स फॅक्टरी, भद्रावती येथून सेवानिवृत्त कर्मचारी होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून व नातवंडे असा मोठा परिवार आहे. या दुःखद प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, पत्रकार बांधव, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी गहिवरून शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.ॐ शांती 🙏
*निधन वार्ता* ऑर्डनन्स फॅक्टरीचे सेवानिवृत कर्मचारी बबनरावजी देवगडे यांचे निधन भद्रावती दि.2:- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सदस्य तसेच दैनिक लोकशाही चे तालुका प्रतिनिधी निशांतभाऊ देवगडे यांचे वडील बबनरावजी देवगडे हे दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोजी स्वर्गवासी झाले. नागपूर येथील ओकार्ड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना दुपारी दोनच्या सुमारास अल्पशा आजाराने त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांचे अंत्यविधी आज दिनांक 2 नोव्हेंबर रोजी 11 वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणाऱ्या अंत्ययात्रेनंतर पिंडोनी स्मशानभूमी येथे पार पडणार आहेत.बबनरावजी देवगडे हे ऑर्डनन्स फॅक्टरी, भद्रावती येथून सेवानिवृत्त कर्मचारी होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून व नातवंडे असा मोठा परिवार आहे. या दुःखद प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, पत्रकार बांधव, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी गहिवरून शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.ॐ शांती 🙏
byमीडीया पोलीस टाईम
-
0