सेवाभावी संस्था प्रबोधन समिती नागपूर विभागाची कार्यशाळा उत्साहात संपन्न** सेवाभावी संस्था प्रबोधन समितीची नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या, कार्यशाळा (वर्धा जिल्हा विभागीय संपादक अब्दुलकदीर शेख) गुरुवार दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी विदर्भ हिंदी साहित्य संमेलन नागपूर येथे पार पडली. या कार्यशाळेला शेकडो संस्थांचा *न भूतो न भविष्यती* असा प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेमध्ये नागपूर विभागातील शेकडो नवीन संस्था आज समितीच्या संपर्कात आल्या आणि राज्यअध्यक्षा डॉ. सौ सुनिताताई मोडक यांनी हाती घेतलेल्या सामाजिक कार्याला आणखीनच उभारी मिळाली,या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी मंत्री यशवंतराव उदयभान निकोसेयांनी भूषविले व प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रणव हळदे सर प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था उपस्थित होते.कार्यशाळेमध्ये पुढील विषयावर मार्गदर्शन झाले.*मोडकळीस आलेल्या संस्थाचे पुनर्वसन,शासकीय योजनांचे पुनर्वसन ,शासकीय योजनाच्या सर्व कागदपत्राविषयी मार्गदर्शन,सर्व सेवाभावी संस्थांची एकमेकांसोबत ओळख,शासनाच्या उद्दिष्टानुसार निधी कसा मिळवायचा,सेवाभावी संस्थांना विभागानुसार कपन्याचा csr निधी उपलब्ध होण्याकरिता मार्गदर्शन.ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रकोष्ठ समिती राज्य सदस्य सन्मा. दिलीपकाका तांदळे, सन्मा.राज्य सदस्य तुषार रेड्डीवार, नागपूर संपर्कप्रमुख सन्मा. मायाताई खरंगकर, करुणा दाभणे, भावना दांडेकर, आर्यन कांबळे,सन्मा.डॉ. धनश्री वैद्य , वर्धा जिल्हाध्यक्ष मंगला भंडारी, प्रकोष्ट समिती नागपूर विभाग अध्यक्ष सन्मा. स्मिताताई बढे यांनी विशेष प्रयत्न केले.यावेळी राज्यध्यक्षा डॉक्टर सौ सुनिता ताई मोडक यांच्यासोबत, राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी, नागपूर विभाग पदाधिकारी,नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्हा आणि तालुका पदाधिकारी आणि शेकडो संस्थांचे संस्थापक, संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेवाभावी संस्था प्रबोधन समिती नागपूर विभागाची कार्यशाळा  उत्साहात संपन्न** सेवाभावी संस्था प्रबोधन समितीची नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या,  कार्यशाळा                                                                                          
Previous Post Next Post