जामनेर ,पिंपळगाव (गोलाईत) जवळ दुचाकी व मालवाहू गाडीचा भीषण अपघातात चार जण ठार (प्रतिनिधी:- संतोष पांढरे जामनेर )पिंपळगाव गोलाईत जवळ दुचाकी व अवजड वाहनाच्या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला आहे ही घटना काल दिलं,२५/११/२५ रोजी मं रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली या अपघातात जामनेर येथील तीन जण तर पहुर येथील एक जण ठार असल्याचे समजले. मालवाहू गाडीचा मालक जुबेर कुरेशी हा गंभीर जखमी झाला आहे, मृतांमध्ये अतुल चंद्रकांत सुरवाडे, अंकुश समाधान लोखंडे, अजय फकीरा सावळे, सर्व राहणार जामनेर व रवींद्र सुनील लोंढे, पहूर त्यांच्या निधनाने कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे,या चारही जणांचा मृतदेह जामनेर येथे शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे,तसेच अपघात ग्रस्त मालवाहू गाडीत जनावरांच्या हाड्डे आढळून आले आहे या घटनेमुळे अवैध कत्तल किंवा तस्करीचा संशय व्यक्त केला जात आहे व या सखोल चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे,पोलिसांकडून या अपघाताची व वाहन मालक यांची सखोल चौकशी होणार असल्याचे सांगितले

जामनेर ,पिंपळगाव (गोलाईत) जवळ दुचाकी व मालवाहू गाडीचा भीषण अपघातात चार जण ठार                                 
Previous Post Next Post