लोकनेते भाई वैद्य अकादमी तर्फे पूरग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.. ( मारोती एडकेवार जिल्हा /प्रतिनिधी नांदेड )नांदेड: लोकनेते भाई वैद्य आकादमी आरोग्य सेना,अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेतर्फे, हिप्परगा थडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना, शिक्षण साहित्य वही, पेन व बॅग पाण्याची बॉटल असे,साहित्य वाटप करण्यात आले.लोकनेते भाई वैद्य अकादमी आरोग्य सेना,अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा, या संस्थेकडून मराठवाड्यामध्ये दुष्काळग्रस्त गावांना व नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली तालुक्यातील महापुरामुळे, अनेक नागरिकांचये बेघर झाले असून या गोरगरीब नागरिकांच्या लेकरांना दिपवाळीच्या,नंतर लागणारे शालेय साहित्य पुस्तके व या पेन व बॅग जिल्हा परिषद शाळा हिप्परगा थडी,येथे आज वाटप करण्यात आले.यावेळी उपस्थित लोकनेते भाई वैद्य अकादमी आरोग्य सेना, अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हाक सभेचे अध्यक्ष, व त्यांचे सहकारी आणि नांदेड जिल्ह्याचे श्री पिटलेवाड सर यांनी,मार्गदर्शन केले व उपस्थित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर,मुत्यापोड सर, कोंडलवाडे सर, नाईक सर,पाटील सर,गायकवाड केसराळीकर सर,व हिप्पारगा थडी, येथील सामाजिक कार्यकर्ते, शिवाजी एडकेवार,पत्रकार मारोती एडकेवार,महमूद साहब शेख,हुसन भाई व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते,व पत्रकार मारोती एडकेवार, यांनी लोकनेते भाई वैद्य अकादमी आरोग्य सेना, अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेने, हिप्पारगा थडी येथील, गोरगरीब नागरिकांच्या, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरवठा केल्याबद्दल या संस्थेचे आभार मानले.

लोकनेते भाई वैद्य अकादमी तर्फे पूरग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना शालेय  साहित्य वाटप..                                            
Previous Post Next Post