डॉ.अण्णा भाऊ साठे वाचनालयात, संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा. ( मारोती एडकेवार जिल्हा: प्रतिनिधी नांदेड) नांदेड : भारत देशातील प्रत्येक दलित, आधीवाशी व सर्व व्यक्तीला माणूस म्हणून जगामध्ये,ओळख करून देणारे आमच्या भारताचे संविधान 26 नोव्हेंबर,संविधान दिनानिमित्त हिप्परगा थडी येथे, डॉ. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अभ्यासिका व वाचनालयात,संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला,यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन, व संविधानाचे अभिवादन करण्यात आले, कार्यक्रमाचे आयोजन डॉ. अण्णा भाऊ साठे वाचनालय समिती यांच्या तर्फे करण्यात आले,यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा सरपंच साहेबराव पिराजी अंजनीकर होते, व प्रमुख पाहुणे म्हणून, कुंडलवाडी एसबीआय बँकेचे मॅनेजर कृष्णा दादा वाडीकर,व माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील मरखले शिंपाळकर,हिपारगा थडी चे सरपंच इनामदार रहेबर,पोलीस पाटील शंकराप्पा मठपती,व समाज अध्यक्ष भगवान एडकेवार,व सर्व ग्रामपंचायतचे सदस्य व गावातील, व मातंग समाजातील महिला व विद्यार्थी उपस्थित होते. छोट्या विद्यार्थ्यांनी, अमूल्य असं मार्गदर्शन भारतीय संविधानाबद्दल दिले, व मार्गदर्शक म्हणून कृष्णा दादा वाडीकर यांनी भारतीय संविधानातील, मूलभूत तत्वे सर्व समाज बांधवांना स्पष्टरित्या सांगितले, यावेळी डॉ. अण्णा भाऊ साठे अभ्यासिका वाचनालयाचे अध्यक्ष पत्रकार मारोती जकोजी एडकेवार, यांनी सूत्रसंचालन केले. व वाचनालयाचे सचिव राजू भूमाजी अंजनीकर यांनी,आभार प्रदर्शन केले. सर्व समाज बांधव व सर्व विद्यार्थी व गावातील सर्व प्रमुख पाहुणे, व प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय संविधान दिन कार्यक्रम हा मोठ्या उत्साहात,डॉ. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे अभ्यासिका व वाचनालय हिप्पारगा थडी, येथे उत्साहात पार पडला.
byMEDIA POLICE TIME
-
0