*नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा.*. (मानवत / प्रतिनिधी.)————————आज मानवत शहरातील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात संविधान दिन विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजयजी लाड यांच्याहस्ते विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संविधान सन्मानार्थ एस. ए. होगे यांनी आपली मनोगत व्यक्त केले. यावेळी जेष्ठ शिक्षक ज्ञानेश्वर कौसाईतकर, अशोक बैस, माणिकराव सिसोदे, कैलासचंद्र सारडा, अनिताताई पतंगे, धनंजय गरुड सचिन सोनटक्के, लक्ष्मण काचगुंडे , अशोक कडतन, दिगंबर रोकडे आदीसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदींची उपस्थित होती.***
byMEDIA POLICE TIME
-
0