सामाजीक मूल्य , न्याय, स्वातंत्र्य, समता ,बंधूत्व रूजविण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यक्ता**©)> गटशिक्षणाधिकारी मंगेशजी नरवाडे.**( मूल्यवर्धन* प्रशिक्षणातील शिक्षकांना मार्गदर्शना बरोबर स्वादिष्ट भोजन आणि रूचकर चहा उपलब्ध. )मानवत / प्रतिनिधी.अनिल चव्हाण.—————————————मानवत मूल्यवर्धन 3.0 टप्पा एक प्रशिक्षण आजच्या स्पर्धेच्या व वेगवान तंत्रज्ञानाच्या माया जाल यामध्ये लोप पावत असलेल्या मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी *शांतीलाल मुथा फाउंडेशन* व शालेय शिक्षण विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यवर्धन 3.0 प्रशिक्षण जिल्हा परिषद प्रशाला मानवत येथे प्रारंभ झाले. या प्रशिक्षणात मानवत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा,खाजगी संस्था शाळा, समाज कल्याण अनुदानित शाळा मधील 460 शिक्षकांचे एकूण तीन टप्प्यांमध्ये प्रशिक्षणाचे नियोजन गटशिक्षणाधिकारी कार्यालय मानवत यांनी केलेले आहे. या प्रशिक्षणात शालेय वयो गटातील विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्य तसेच काळानुरूपची मूल्य लोकशाहीतील जबाबदार, संवेदनशील आणि मूल्यद्दिष्टित नागरिक होऊन शैक्षणिक, सामाजिक, न्याय, स्वातंत्र्य, समता बंधुत्व यासारख्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील आवश्यक अशा मूल्यांची रुजवणूक व्हावी यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी गटशिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले यावेळी मानवी जीवनात संविधानिक मूल्याची जोपासना व त्याची प्रचिती येत असल्याचे सांगितले. या मूल्यवर्धन प्रशिक्षणामार्फत शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना जबाबदार देशभक्त व समाज वत्सल विद्यार्थी घडवावे ही अपेक्षा व्यक्त केली. या प्रशिक्षणात शांतीलाल मुथा फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक दत्ता भुजबळ, तालुका समन्वयक प्रवीण नरवाडे, गट साधन केंद्राचे ( BRC ) राजकुमार गाढे, दिगंबर गिरी, आत्माराम पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी नीलू पवार, केंद्रप्रमुख प्रकाश मोहकरे ओम मुळे सर, गजानन वांबूरकर, प्रमोद बोरीकर,सीमाताई सिसोदे, ज्ञानेश्वर जलसिंगे,सीमा सिसोदे, ज्ञानेश्वर देवरे आधी प्रशिक्षणात सहकार्य करत आहेत.***

सामाजीक मूल्य , न्याय, स्वातंत्र्य, समता ,बंधूत्व  रूजविण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यक्ता**©)> गटशिक्षणाधिकारी मंगेशजी नरवाडे.**( मूल्यवर्धन* प्रशिक्षणातील शिक्षकांना मार्गदर्शना बरोबर स्वादिष्ट भोजन आणि रूचकर चहा उपलब्ध.
Previous Post Next Post