गिरड जिल्हा परिषद सर्कल साठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राकेश चंदनखेडे प्रबळ दावेदार..... (वर्धा जिल्हा विभागीय संपादक अब्दुलकदीर शेख ) गिरड येथील निष्ठावंत शिवसैनिक म्हणुन ओळख असणारे आणि गेल्या 7 वर्षापासून गिरड सारख्या मोठ्या गावाचे तंटा मुक्ति अध्यक्ष म्हणून सामाजिक क्षेत्रात असणारे राकेश चंदनखेडे यांचे नाव जिल्हा परिषद गिरड सर्कल साठी जोरात सुरु आहे आणि त्यांनाच उमेदवारी मिळणार असे जवळ जवळ पक्के झाले आहे पक्ष्याची उमेदवारी त्यांनाच मिळण्याचे कारण की त्यांचे वडील माझी विभाग प्रमुख स्वर्गीय रामभाऊ जी चंदनखेडे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक आणि त्याच विचाराने पाऊलवार पाऊल टाकत राकेश चंदनखेडे ने सुद्धा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून काम केले त्यांनी या अगोदर युवा सेना तालुका प्रमुख म्हणून सुद्धा जबाबदारी पार पाडली त्यांचा सर्कलमधील जनसंपर्क खुप चांगला असून सर्कल्मधील शिवसैनिक सुद्धा त्यांचा पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांनाच उमेदवारी मिळणार असे जवळ जवळ पक्के झाले असून तसे ते कामाला सुद्धा जोमाने लागले आहेत
byमीडीया पोलीस टाईम
-
0