सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कळविण्यात येते की, समुद्रपुर कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपुर अंतर्गत येणाऱ्या मे.एमजेआर ॲग्रोटेक प्राइवेट लिमिटेड खापरी (धोंडगाव ), मे. सुदर्शन कॉटन इंडस्ट्रीज प्रा.ली.जाम व मे.प्रकाश व्हाईट गोल्ड ऊबदा येथे सीसीआय मार्फत कापुस खरेदी शुभारंभ समितीचे सभापती श्री. हिंमतराव चतुर यांचें शुभहस्ते संपन्न झाला आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाईन कापुस नोंदणी करतांना डिजिटल 7/12 ज्यावर पिक पेरा नोंद आहे PDF करुन, फोटो, आधार कार्ड डाऊनलोड करावे.कपास किसान गुगल प्ले स्टोअर मोबाईल ॲपद्वारे स्वतःच्या आधार लिंक मोबाइल द्वारे करुन घ्यावी. कोणत्याही केंद्रावर गर्दी आणि लांब रांगा टाळण्यासाठी सीसीआय नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी कपास किसान मोबाइल ॲपद्वारे स्लॉट बुकिंग सुविधा सुरू केली आहे.या ॲपद्वारे शेतकरी 7 दिवसांच्या अंतराने स्लॉट बुक करू शकतात आणी स्लॉटच्या उपलब्धतेनुसार त्यांची पसंतीची विक्री तारीख निवडू शकणार आहे.स्लॉट बुकिंगनंतर किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत केवळ नोंदणीकृत शेतकरीच त्यांचा कापुस सीसीआय ला विकण्यास पात्र असेल.स्लॉट बुकिंग हि ऑनलाईन नोंदनी झाल्यानंतरची प्रक्रिया आहे. नोंदणीची अंतिम मुदत 31डिसेंबर आहे.काही शेतकरी बांधवांनी स्वताच्या मोबाइलनी ऑनलाईन नोंदनी केली आहे परंतु नोंदणीसाठी लागणारे दस्तावेज व्यवस्थित अपलोड झालेले नाही असे समितीद्वारे कापुस विकायला संमती देताना दिसून येत आहे.अश्या शेतकऱ्यांना समितीकडून फोनद्वारे कळविण्यात येत आहे.तरी सुद्धा काही शेतकऱ्यांशी संपर्क न झाल्यास त्यांनी समुद्रपूर बाजार समितीत येवून आपले ऑनलाईन रजिस्टरेशन झाले किंवा नाही याची खात्री करून घ्यावी, जेणेकरून कोणीही शेतकरी आधारभूत किंमत योजनेपासुन वंचित राहणार नाही.आपला नविन निघालेला कापुस ज्याची आर्द्रता 12% पर्यंत आहे असा कापुस विक्रिकरिता आणावा. लवकरच समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येनाऱ्या उर्वरित कापुस जिनमध्ये सुद्धा सीसीआय ची कापुस खरेदी सुरु होणार आहे.अधिक माहितीसाठी समितीचे श्री.चंद्रशेखर राऊत संगणक चालक मो.नं.9834597807 यांचेकडे संपर्क साधावा. शेतकरी बांधवांनी आधारभूत किंमत योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन समिति सभापती श्री. हिंमतराव चतुर, उपसभापती श्री. वामनराव चंदनखेडे, जिनचे सर्वेसर्वा,संचालक मंडळ तसेच सचिव श्री. शंकर धोटे यांनी केले आहे.

Previous Post Next Post