**मानवत व्यापारपेठ कडकडीत बंद ठेऊन सूवर्णकार संघटनेच्या वतीने घटनेचा जाहिर निषेध**. (मानवत / प्रतिनिधी.*)—————————————सुवर्णकार समाजाची बालिका कुमारी *कु, यज्ञ जगदीश दुसाने* हिच्यावर बलात्कार करून निधृण हत्या केल्या बाबत मानवत तालूका सुवर्णकार संघटना व सराफ असोसिएशनच्या वतीने आज जाहीर निषेध करून मानवत तहसीलवर मोर्चा काढण्यात आला.सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील *डोंगराळे* गावातील सुवर्णकार समाजाची *कुमारी यज्ञ जगदीश दुसाने* या नाबालिक बालिकेवर बलात्कार करून तिची निघृन हत्या केल्याच्या निषेधार्थ मानवत तालुका सराफा असोसिएशन व मानवत सुवर्णकार संघटनेच्या वतीने मानवत शहरातील *त्रिमूर्ती* चौकातून मानवत तहसीलवर भव्य मोर्चा काढण्यात आला. *कुमारी यज्ञ दुसाने* हिच्यावर झालेल्या बलात्कार व हत्तेच्या निषेधार्थ आज संपूर्ण मानवत शहर नागरिकासह व्यापारी बांधवांच्या वतीने कडकडीत बंद ठेवण्यात आले.मानवत शहरातील त्रिमूर्ती चौकातून निघालेला मोर्चा मानवत पोलीस स्टेशन बस स्टॅन्ड मार्गे तहसील कार्यालयावर काढण्यात आला यावेळी मानवत तालुका सराफा असोसिएशनचे *अध्यक्ष कपिल उदावंत* मानवत सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष *संजय नरहरी शहाणे,* कालिदास चारी, प्रवीण वर्मा, पवन वर्मा, मंगेश उदावंत, अरुण गवते, गणेश गहुले. इत्यादी समाज बांधवासह सराफा असोसिएशनच्या वतीने मानवत तहसिलचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना *कुमारी यज्ञ जगदीश दुसाने* या बालिकेचा बलात्कार करून हत्या केली त्याच्या निषेधार्थ आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी दिलेल्या निवेदनामध्ये या गुन्ह्यातील आरोपीवर आरोप पत्र जलद गतीने दाखल करून फास्टट्रॅक कोर्टात दाखल करावे, आरोपी फाशीची शिक्षा व्हावी यासाठी कायद्यात फेरबदल करून कठोर कायदा निर्माण करावा पीडित मुलीच्या कुटुंबाला शासकीय आर्थिक मदत देण्यात यावी, या घटनेतील सरकारी वकील म्हणून एडवोकेट *उज्वल निकम* यांना नियुक्त करावे, पीडित कुटुंबीयांना संरक्षण द्यावे या मागणीचे निवेदन मानवतचे तहसीलदार *पांडुरंग माचेवाड* यांना देण्यात आले. यावेळी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झालेले नागरिक यांच्यासह मानवत सराफा *असोसिएशनचे अध्यक्ष* कपिल उदावंत नितीन वेदपाठक, संजय नरहरी शहाणे, अरुण गवते, पवन वर्मा,प्रवीण वर्मा ,गणेश वर्मा, दीपक डहाळे, संदीप कुलथे, संदीप कुलथे,शशिकांत शहाणे, मधुकर शहाणे, गणेश गहूले, नवनाथ कुलथे, सुनील गहुले, ईश्वर शहाणे, मुन्ना उदावंत, कालिदास चारी, मंगेश उदावंत, परमेश्वर उदावंत, ज्ञानेश्वर शहाणे, मारुती टाक,दीपक कुलथे, गणेश बोराडे वैभव डहाळे कुलदीप जडे गोविंद पेचफुले, प्रशांत डहाळे, रमण डहाळे, रोहित लोलगे, रामेश्वर चिंतामणी, गजानन गवळी, गणेश शहाणे, संजय शहाणे, शिवाजी डहाळे, पद्माकर डहाळे, संतोष उदावंत, प्रशांत उदावंत, उद्धव चुलवंत सतीश सपाटे, सध्या नगरपालिकेचे निवडणुकीचे वातावरण असताना या मोर्चामध्ये डॉक्टर लाड, भाजपाचे अनंत गोलाईत, शिवसेना शिंदे गटाचे बालाजी कुराडे, विक्रम दहे, सुरेश काबरा, मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, गणेश मोरे, पप्पू बारहाते‌, माजी नगरसेवक गोपाल गौड, किराणा व्यापारी असोसिएशनचे सचिन कोकर, मानवत शहरातील शेकडो नागरिक व व्यापारी मोठ्या संख्येने या निषेध मोर्चामध्ये सहभागी होते.या निषेध मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सर्व समाज बांधवांचे व्यापारी व नागरिकांचे मानवत तालुका सराफा असोसिएशनचे अध्यक्ष कपिल उदावंत यांनी आभार मानले. मानवत सुवर्णकार व सराफा शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या आहे. मानवत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सरवदे यांना निवेदनाची प्रत देण्यात आली.****

मानवत व्यापारपेठ  कडकडीत बंद ठेऊन सूवर्णकार संघटनेच्या वतीने घटनेचा जाहिर निषेध**.                                      
Previous Post Next Post