*जिल्हात शिवशाहीची अवस्था मोडकळीस आगार प्रमूखांचे दूर्लक्ष**खराब शिवशाही बस मधून प्रवाशांना करावा लागतो जीवघेणा प्रवास*. (*मानवत / प्रतिनिधी.**)—————————————*महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आपल्या लालपरीच्या ताफ्यात अनेक नविन नविन सेवा सुविधानी सूसज्ज असलेल्या अशा नविन बसेस दाखल करून घेतल्या त्यामूळे घाट्यात जाणारे महामंडळ आज नफ्यात चालत आहे. पण व्यवस्थापणाचे याकडे दूर्लक्ष होत असल्याने आज शिव शाही ही अखेरची घटका मोजत आहे. त्यामूळे नाहक प्रवांशांना जादा भाडे देऊन ही त्रास सहन करण्याची पाळी आली असल्याने बीड परभणी महामार्गावर धावणार्‍या सर्व शिवशाही बसेस थांववून साध्या गाड्या वाढवाव्यात अशी मागणी त्रस्त प्रवाशांमधून होत आहे.सविस्तर वृत्त असे की,परभणी आगाराची शिवशाही ही बीड, पाथरी वरून परभणी कडे जाण्यासाठी मानवत बसस्थानकात आली.त्यावेळी अनेक प्रवाशी चढले पण गाडी ना दूरूस्त असल्याची ओरड चालक हे करीत असून ही जाण्याच्या गरबडीत काही प्रवाशी बस मध्ये चढले व प्रवासाचे १०५ रूपये भरून टिकिट घेतले पण शहरापासून एक किलो मिटर अंतरावर बस खराब झाल्याची सूचना चालकांनी देऊन २५/३० प्रवाशांना साध्या गाडीत बसून देण्याची पाळी वाहकावर आली.याचा त्रास चालक व वाहक यांना सुध्दा भोगावा लागला. नादूरूस्त गाड्यामुळे विनाकारण प्रवांशांना जादा भूर्दंड व मानसीक मनस्ताप सहन करावा लागला.*आगार प्रमूख* यांनी लक्ष देऊन शिवशाही बसेस ची झालेली दैणिय अवस्था लक्षात घेऊन या मार्गावरून धावणार्‍या बसेस कायम बंद कराव्यात अशी मागणी प्रवांशा मधून होत आहे.*

जिल्हात शिवशाहीची अवस्था मोडकळीस आगार प्रमूखांचे दूर्लक्ष**खराब शिवशाही बस मधून प्रवाशांना करावा लागतो जीवघेणा प्रवास*.                                                  
Previous Post Next Post