अडावद येथे दिल्लीच्या पथकाने जनगणनेचा घेतला आढावा (चोपडा विभागीय संपादक संजीव शिरसाठ ) अडावद ता. चोपडा येथे सुरू असलेल्या जनगणना पूर्व चाचणीचे काम सुरू आहे. याबाबतचा आढावा घेण्यासाठी दिल्ली येथून उपमहा रजीष्ट्रार वैशाली वराडे आलेत. २५ रोजी सकाळी १० वाजता इंदिरानगर भागातील जनगणना प्रगणक/पर्यवेक्षक यांचेशी घरयादी व घरगणना पूर्वचाचणी (एचएलओ) याबाबत साधत २०२७ ची होणारी जनगणना हि डिजिटल स्वरूपाची होत यात येणाऱ्या, अडचणी त्यांनी जाणून घेतल्यात व मार्गदर्शन केले. या जनगणनेत महाराष्ट्रात तीन ठिकाणी पूर्व चाचणी घेण्यात येत आहे त्यामध्ये चोपडा तालुक्यातील २६ गावांचा समावेश करण्यात आला आहे. पूर्व चाचणी मध्ये येण्याऱ्या समस्या, अडचणी, अँप कशा प्रकारे कार्य करते या सर्वांची अभ्यास पूर्ण माहिती जनगणना २०२७ साठी तपासली जाणार आहे. यावेळी महाराष्ट्र जनगणना सहायक निदेशक अजय ठाकुर, उप सहायक निदेशक सागर बागुल साहेब, मंडलाधिकारी अजय पावरा, तलाठी वीरेंद्र पाटील, प्रगणक पि. आर. माळी, एम.एन.माळी, एस.के. महाजन, एस. बी. चव्हाण, यांचेसह पर्यवेक्षक व प्रगणक उपस्थित होते.

अडावद येथे दिल्लीच्या पथकाने जनगणनेचा घेतला आढावा                                                                                                       
Previous Post Next Post