जळगाव जिल्हातील मुक्ताईनगर पोलिस स्टेशन,व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले ( जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितू इंगळे ) नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावच्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार डोकं दगडाने ठेचून केली हत्या, या प्रकरणात निवेदन देताना ऑल इंडिया पॅंथर सेना जिल्हाध्यक्ष लखन भाऊ पानपाटील .. डोंगराळे नाशिक जिल्ह्यातलं एक असं शहर आहे ज्या ठिकाणी विविध जाती धर्माचे लोक राहतात. डोंगराळे सध्या चर्चेत आलं आहे ते तीन वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कार आणि त्यानंतर तिच्या हत्येच्या प्रकरणामुळे. जिला नीट बोलताही येत नव्हतं अशा मुलीवर २४ वर्षांच्या माणसाच्या वेशात वावरणाऱ्या सैतानाने बलात्कार केला. त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या केली. या प्रकरणाने संपूर्ण राज्य सुन्न झालं आहे. या प्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी अशी ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी. मागणी पूर्ण नझाल्यास राज्यामध्ये आंदोलनाचा इशारा दिला आहे.आज जिल्हातील मुक्ताईनगर पोलिस ठेशन,व तहसीलदार यांना डोंगराळे येथे चिमुकलीवर घडलेल्या निषेधार्थ, ऑल इंडिया पॅंथर सेनेकडून नेवदन देण्यात आले.त्या वेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष लखन पानपाटील उपाजिल्हाध्यक्ष अजय शेलारजिल्हा सचिव सागर बावसकर शहराध्यक्ष प्रथमेश भास्कर सोशल मीडिया प्रमुख समीर गाढे. आदित्य गजरे. श्रावण भालेराव.राहुल पानपाटील,अतुल भाऊ, दीपक गाढे,सपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0