भा.ज.पा.कडून शिवलिंग गायकवाड अटकळीकर अटकळी प.स.गणातून इच्छुक.. (मारोती एडकेवार जिल्हा प्रतिनिधी नांदेड) नांदेड :बिलोली तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडून आरक्षण जाहीर झाल्यानंतर अटकळी गणातून अनेक इच्छुक असल्याचे चित्र प्रसार माध्यमातून येत आहे समाजाची बांधिव असणारा आटकळी येथील सामाजिक कार्यकर्ते शिवलिंग गायकवाड हे त्यांचे मोठे बंधू राजू गायकवाड यांच्या पत्नी सौ देवनंदा राजू गायकवाड यांच्यासाठी अटकळी गणांत भारतीय जनता पार्टी कडून इच्छुक उमेदवार म्हणून वरिष्ठाकडे मागणी केली. शिवलिंग गायकवाड हे लोकप्रिय आमदार जितेशभाऊ अंतापूरकर यांचे निकटवरतीय व विश्वासू मानले जातात. गेले पंधरा ते वीस वर्ष्यापासून ते अटकळी व अटकळी परिसरात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून ते अनेक संघटना व आंदोलनामध्ये सक्रिय असतात. म्हणून अटकळी गण व गट परिसरात त्यांचा चांगला मित्रपरिवार व जनसंपर्क आहे. म्हणून भारतीय जनता पार्टी व वरिष्ठ यांनी संधी दिल्यास निश्चितच संधीचे सोने करू अशी इच्छा शिवलिंग गायकवाड यांनी केली.
byमीडीया पोलीस टाईम
-
0