*भडगाव येथील ब्रिटिश कालीन गिरणा नदी पुलावरून पेरू ने भरलेला ट्रक पलटी झाल्यामुळे भीषण अपघात कोणतीही जीवितहानी नाही*. (पाचोरा विशेष तालुका प्रतिनिधी साहेबराव तडवी ) भडगाव येथील पारोळा भडगाव हायवे वरील ब्रिटिश कालीन पूल हा संपूर्ण जीर्ण झालेला असून त्याच्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत वाहनधारकांना वाहन चालवणे विक्रीचे झालेले आहे. या पुलावरून चाळीसगाव पाचोरा येथून पारोळा कडे एरंडोल कडे तसेच धुळ्याकडे जाणारे भरपूर वाहने असतात आणि हा त्या गावांना जोडणारा एकमेव पूल असल्यामुळे या फुलाची दुरवस्था झालेली आहे आज त्या पुलावरून पेरूणी भरलेला ट्रक येत असताना ड्रायव्हर खड्डे चुकवण्याच्या नादात समोरून वाहन येत असताना ट्रक कठड्याच्या खाली पडला सुदैवाने गिरणा नदीला कमी प्रमाणात पाणी असल्यामुळे तसेच ट्रक मध्ये पेरू भरलेले असल्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही चालकाने प्रसंगावधानाने पलटी झालेल्या ट्रक मधून नदीपात्रात उडी घेतल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच पोलीस कर्मचारी करत आहेत
byMEDIA POLICE TIME
-
0