मरण जवळ आलंय???********************. सौजन्य : बाळासाहेब पाटील परवा शेतकऱ्याने खो-याचा दणका देऊन तहसिलदारची गाडी चुरा केली ...काल अमरावतीत शेतक-याने दगड घालून कलेक्टरची गाडी फोडली .... चक्का जाम करुन शेतकऱ्यांनी नागपूरमधील राष्ट्रीय महामार्ग बंद केलेत ...शेतकरी आंदोलक म्हणताहेत ...आमदारांना कापणार शेतकरी नेते म्हणाताहेत .... मंत्र्यांना कापा ... ही सगळी कशाची लक्षणं आहेत ?फडणवीस सरकारलाच कायदा आणि सुव्यवस्था नको आहे ?का फडणवीस सरकारचेच मरण जवळ आलंय ?काही कळायला मार्ग नाही पण परिस्थिती स्फोटक बनतेय ... परिस्थिती हाताबाहेर चाललेय ...सरकार सुस्तपणाने आपल्याच मस्तीत तरंगतंय !महाराष्ट्रात ही अराजकता बघितली की कुठल्याही शांतताप्रिय माणसाला अस्वस्थ वाटल्याशिवाय राहत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रहारचे बच्चू कडू गेले अनेक वर्षे झालं आंदोलन करताहेत . त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना ८ वेळा स्मरणपत्र लिहिली आणि फडणवीसांनी त्यांच्या पत्रांना कचराकुंडी दाखवली .बच्चू कडूंनी रायगडाच्या पायथ्याशी उपोषण केलं . फडणवीस सरकारने त्याकडे ढूंकुनही पाहिलं नाही . आता लाखो शेतकरी नागपूरमध्ये रस्त्यावरती उतरलेत आणि फडणवीस सरकार न्यायालयाच्या आड दडुन शेतकऱ्यांच्या वरती हल्ला करतंय .कर्जबाजारीपणाला कंटाळून विदर्भात दररोज १२ शेतकरी आत्महत्या करताहेत . शेतकरी आत्महत्येच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे .सांगली जिल्ह्यातील शेतक-यांच्या पोरांना १२एकर ऊस शेती आहे पण तो पोरगा शेती करतोय म्हणून ४२ वर्षे वय झालं तरी त्याचं लग्न होत नाही .विदर्भ मराठवाड्यातील शेतक-यांच्या जमीनी पाऊसाने खरडून गेल्या . जनावरं पुरात वाहून गेली .सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार बागा वांझ गेल्या म्हणून हतबल झालाय . ऊसाचा दर न ठरवताच साखर कारखाने ऊस गाळप करताहेत .परदेशातुन सरकारने बेदाणा मागवुन देशातील बेदाणा उत्पादकांचे कंबरडे मोडलेले आहे . प्लॅस्टिकची फुलं चिनमधुन आयात करुन सरकारनं देशातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना उघड्यावर पाडलंय . उडीद,सोयाबीन उत्पादन करण्यासाठी घातलेला खर्चही निघालेला नाही .मिरज तालुक्यातील काकडवाडी गांवातील शेतकऱ्यांने भुईमुगाच्या पिकांसाठी ८ हजार रुपये खर्च केले आणि ५० किलोची दोन पोतीच भुईमुगाच्या शेंगा निघाल्या . हुमणी किडीच्या प्रादुर्भावाने भुईमूग ,ऊसाची लागण उध्वस्त झाली आणि फडणवीस सरकार न्यायालयाच्या आडाने नागपूरमधील आंदोलकांना शहरातुन बाहेर हाकलण्यासाठी कपटनितीचा कहर करतंय . मुख्यमंत्री फडणवीस यांची कपटनिती शेतक-यांना काही नवीन नाही . नागपूरमध्ये रस्त्यावरती उतरलेला लाखोंच्या संख्येतील शेतकरी हा हिंदू आहे आणि सध्या तो खत-यामध्ये आहे पण भिडे गुरुजी ,विश्व हिंदू परिषद ,सनातन ,बजरंग दल , हिंदू महासभा यापैकी कोणतीही संघटना हिंदू शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी पुढं येत नाही .यांची ही ढोंगी राष्ट्रभक्ती गळफास घेऊ पाहणाऱ्या शेतक-याला उपयोगी पडत नाही .शेतकऱ्यांच्या या आंदोलनाने उग्र रूप धारण केले तर फडणवीस आणि त्यांच्या सरकारला तोंड दाखवायला जागा राहणार नाही .तिकडं नागपुरात शेतकरी न्याय हक्कासाठी आक्रोश करताहेत आणि इकडं मुख्यमंत्री फडणवीस फलटनमधील माजी खासदाराला वाचविण्यासाठी धावुन जाताहेत ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे ? तिकडं प्रहारचे बच्चू कडू जेल भरो ची गर्जना करत आहेत आणि इकडं केद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत भाजप पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनात रममान झाले ही कसली भाजपची संवेदनशीलता म्हणायची ? तिकडं शेतकरी रस्त्यावरती येल्गार करतोय आणि त्याच नागपुरच्या कार्यालयात अजित पवारचे कार्यकर्ते बाया नाचवताहेत .याला काय म्हणायचं ? शेतकऱ्यांचा सातबारा करणार कोरा...कोरा कोरा ...असं कर्णकर्कश आवाजात निवडणूक प्रचारात ओरडणा-या फडणवीसांचा आता आवाजच बंद झालाय. सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत सकारात्मक आहे असली मिळमिळीत पुळचट भाषा फडणवीस करताहेत . नागपूर मधील शेतकरी आंदोलनाचा पेशंटना त्रास होतोय असं फडणवीस म्हणताहेत पण फडणवीसांच्या फडतुस कारभाराने शेतकरी पेशंट होतोय त्याचं काय ?फडणवीसांचे हे धोरण म्हणजे अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचे मरण झालेलं आहे . फडणवीसांना शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या लढ्यातही राजकारण दिसतंय म्हणजे त्यांची दृष्टी साफ नाही . त्यांच्या नजरेत खोट भरलेली आहे आणि ती उपाशीपोटी लढणा-या शेतकऱ्यांच्या पोटावर मारते आहे .बच्चू कडूंनी जेलभरो आंदोलन केलं तर त्याचे पडसाद महाराष्ट्रातील प्रत्येक गांवात उमटणार आहेत आणि ही परिस्थिती फडणवीस सरकारला परवडणार नाही . फडणवीसांच्या डोकीत पोलिस बळाचा वापर करून शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा विचार असु शकतोय तसं झालं तर पोलिस बळ कुठं कुठं म्हणून पुरणार ?नागपुरातील शेतकरी आंदोलक छाताडावरती फडणवीस सरकारच्या बंदुकीच्या गोळ्या झेलायला तयार झालेत .आम्ही गांधीबाबाच्या मार्गाने आलोय पण क्रांतीवीर भगतसिंगांच्या वाटेने जाऊ असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय . पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीत जे आंदोलन केलं त्याच धर्तीवर बच्चू कडू हे तयारी करुन आंदोलनात उतरलेत आणि त्यांना महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटनानी पाठिंबा दिलाय .माजी खासदार राजु शेट्टी ,अजित नवले यांच्या सारखे आंदोलनात मास्टरी असणारे नेते नागपुरच्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करताहेत .मराठा आंदोलक मनोज जरांगे हे सुध्दा आंदोलनात सहभागी होण्यासाठी नागपुरला रवाना झालेत . जरांगेंची बंद दाराआड तास न् तास मनधरणी करणारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही सपशेल तोंडावर आपटलेत .सरकारकडून मुदत मागण्यांसाठी गेलेल्या तथाकथित संकटमोचक महाजनांना बच्चु कडुनी ठेंगा दाखवलाय .ईव्हीएम मशीनच्या जोरावर आणि सवंग लोकप्रियतेच्या घोषणाबाजी करुन आम्ही सत्तेत राहून शकतोय या कैफात फडणवीस धुंद असतील तर ते आत्मघातच करुन घेताहेत असंच म्हणावं लागेल .नागपूरमधील या शेतकरी आंदोलनात सांगलीचे माजी खासदार संजय पाटील हे सहभागी होण्यासाठी गेलेले नाहीत . त्यामुळे त्यांच्या शेतकऱ्यांच्या विषयी प्रामाणिकपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे .नागपूरच्या या शेतकरी आंदोलनाबाबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री चकार शब्द काढत नाहीत हे बरेच काही सांगून जाणारे आहे .या आंदोलनाबाबत फडणवीस सरकार जितका विलंब करेल तसं त्यांनी चेह-यावरती चढविलेला नकली मुखवटा फाटत जाणार आहे आणि त्याची महायुतीला आगामी निवडणुकीत किंमतही मोजावी लागणार आहे !!!---- बाळासाहेब ल.पाटील
byMEDIA POLICE TIME
-
0