*उक्कलगाव जि.प. प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी उपक्रम**{ उपक्रमाचे सर्वस्तरांतून कौतूक }. (*मानवत /प्रतिनिधी.*)————————*मानवत तालूक्यातील उक्कलगांव जि. प. प्राथमीक शाळेत विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी उपक्रम साजरे.सविस्तर वृत्त असे की, मानवत तालूक्यातील उक्कलगावजि. प. प्राथमीक शाळेच्या वतीने विद्यार्थांसाठी वेळोवेळी घेण्यात आलेल्या *एन एम एम एस* सराव चाचणी परिक्षेमध्ये 100 पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने रजिस्टर भेट देऊन गौरविण्यात आले.तर रविवारी होत असलेल्या *एन एम एम एस* सराव परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना यश व प्रेरणा मिळण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री शेख सर यांच्या वतीने वर्ग आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना पॅड व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले व परिक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे सन्माननीय उपाध्यक्ष श्री सोपानराव पिंपळे पाटील ज्येष्ठ नागरिक श्री अर्जुनराव पिंपळे , तर उक्कलगांव जि.प. शाळेचे मुख्याध्यापक श्री शेख सर तसेच शाळेतील शिक्षक, बंधू-भगिनी यांची यावेळी उपस्थिती होती.✨🌷🙏🌷✨

उक्कलगाव जि.प. प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी उपक्रम**{ उपक्रमाचे सर्वस्तरांतून कौतूक }. 
Previous Post Next Post