*नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयात *आनंदनगरी* कार्यक्रम संपन्न.. मानवत ( अनिल चव्हाण.—————————येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालया मध्ये दिनांक २७ डिसेंबर रोजी आनंददायी शनिवार निमित्त विद्यालया मध्ये आज *आनंद- नगरी कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक संजयजी लाड, उपमुख्याध्यापक विश्वनाथ बुधवंत, बाळासाहेब नाईक यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले, यावेळी प्राथमिक विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक अनिल चव्हाण, बालाजी गोंन्टे, एकनाथ मुळे, एस. एन. कच्छवे, श्रीमती संगीताताई थोरे, श्रीमती कुसूमताई कणकूटे, आदींची या वेळी उपस्थिती होती.सविस्तर वृत्त असे की,आनंददायी शनिवार निमित्त आज नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयातील इयत्ता तिसरी व चौथी वर्गातील शालेय मुला- मुलींनी आज विद्यालयात घेण्यात आलेल्या आनंददायी शनिवार या अभियानार्तगत *आनंदनगरी* कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांना श्रीमती संगीताताई थोरे, बालाजी गोंन्टे, एकनाथ मुळे , एस.एन. कच्छवे, आदींच्या मार्गदर्शनाखाले *आनंदनगरी* कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शालेय मूलांना अर्थीक नियोजन , व्यवसायातील चढ उतार, व मालाची मागणी , आवक,जावक अर्थीक व्यवसायांचे सोर्स कोण कोणते या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.**
byमीडीया पोलीस टाईम
-
0