रोहिले बुद्रुक शिवर रस्त्याच्या चौकशीच्या लेखी आश्वासनाला गटविकास अधिकारी कडून केराची टोपली बातमी नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मौजे रोहिले बुद्रुक येथील जिरी शिवार रस्त्याचे कामकाज निकृष्ट दर्जाचे झालेले असून अंदाजपत्रकानुसार काम झालेली नाही. मात्र सात ते आठ लाख रुपये मजुराचे नावे काढल्याचे लक्षात आल्यामुळे रोहिले बुद्रुक येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हा ग्रामीण पूर्व अध्यक्ष मुक्ताराम बागुल यांनी सप्टेंबर 2025 मध्ये बेमुदत आमरण उपोषण केले होते. या उपोषण स्थळी नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकिसन खताळे यांनी चौकशी समिती नेमुन दोषिंवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी लेखी आश्वासन दिली होते. परंतु अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची चौकशी आगर कारवाई करण्यात आलेली नसून या लेखी आश्वासनाला नांदगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी खताळे यांनी केराची टोपली असल्याचे सिद्ध होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथील ग्रामपंचायतीचे सरपंच ठकुबाई देवीदास पवार, उपसरपंच सौ. सुनंदा मुक्ताराम बागुल हे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असून देखील यांना रोहिले बुद्रुक येथील जिरी शिवार रस्त्याबाबत कुठल्याही प्रकारची माहिती नाही. या शिवर रस्त्याचे काम ग्रामरोजगार सेवक बाबासाहेब तुकाराम अरबूज यांनी हस्तक्षेप करून दबाव टाकून जिरी शिवार रस्त्याचे काम केल्याचे समोर आले असून मजुरांच्या सात ते आठ लाख रुपये काढल्याचे समोर आले आहे. मात्र रोहिले बुद्रुक येथील जिरी शिवार रस्त्याचे कामकाज इस्टिमेट (अंदाजपत्रका) प्रमाणे नियमानुसार झालेले नसून रस्त्याचे काम अंदाजे फक्त अर्धा किलोमीटर झाला असून या रस्त्याच्या कडेला नाल्या चे खोदकाम केलेले नाही. शिवर रस्त्याच्या नियमाप्रमाणे रुंदी देखील झालेली नाही. त्यामुळे या रस्त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत चे माजी ग्रामपंचायत सदस्य तथा वंचित बहुजन आघाडीचे नाशिक पूर्व प्रसिद्धीप्रमुख मुक्ताराम बागुल यांनी रोहिले बुद्रुक येथे सप्टेंबर 2025 मध्ये दे मुदत आमरण उपोषण केले होते. सदर उपोषण स्थळावर नांदगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्रीकिसन लक्ष्मण खताळे यांनी दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी भेट देऊन लेखी आश्वासन दिले होते. मौजे रोहिले बुद्रुक येथील जिरी शिवा रस्त्याचे कामकाज निकृष्ट दर्जाचे झाले असून अंदाजपत्रकाप्रमाणे काम झालेले नाही. याबाबत कार्यवाही करण्यात यावी अन्यथा उपोषण करण्यात येईल याबाबत सत्य परिस्थिती पडताळणी करण्यात येऊन याबाबत चौकशी समिती नेमण्यात आली असून या समितीत श्री अरुण भटुलाल वाघ (वि. अ. कृषी) , श्री. लोकेश पाटील (तांत्रिक अधिकारी), श्री गणेश घुगे (सहा. गट कार्यक्रम अधिकारी) यांची संयुक्त समितीद्वारे मौजे रोहिले बुद्रुक येथील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत शिवर रस्ते बाबत सफल चौकशी करण्यात येऊन वस्तू लिस्ट अहवाल 7 दिवसाच्या आत कार्यालयास सादर करावा असे म्हटले आहे. परंतु चौकशी समितीने अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची चौकशी केलेली नसून नांदगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी देखील कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. नांदगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी खताळे यांनी लेखी आश्वासनाला केराची टोपी दाखविण्याचा घडला आहे त्यामुळे पुन्हा बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा मुक्ताराम बागुल यांनी दिला आहे. मीडीया पोलीस टाईम साठी नांदगाव नाशिक प्रतिनिधी मुक्ताराम बागुल (नाशिक)
byमीडीया पोलीस टाईम
-
0