चोपडा नगरपरिषद निवडणूक शेकडा ६७.९७ मतदान..डिसेंबर ०२, २०२५. (चोपडा विभागीय उपसंपादक संजीव शिरसाठ) चोपडा नगरपरिषद निवडणूक शेकडा ६७.९७ टक्के शांततेत मतदान.. मुक्ताईनगर व जामनेर येथे राडा.. वरणगाव दोन गटात शाब्दिक चकमक चोपडा दि.२(प्रतिनिधी)चोपडा नगरपरिषद सन 2025 चे सार्वत्रिक निवडणूकीत आज दि.२डिसेंबर रोजी नगराध्यक्षपदासह १५ प्रभागात ३१नगरसेवक पदासाठी किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. सायंकाळच्या सुमारास मतदान वाढल्याने रात्री दहा सव्वा दहा वाजेपर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या . संपूर्ण शहर प्रभागात एकुण 45 हजार 311 मतदारांनी हक्क बजावला असून त्यात 22,819पुरुष मतदारांनी तर 22,490 महिला व इतर 2 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे असे चोपड्याचे एकुण शेकडा 67.97% मतदान झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मनिष गायकवाड व सहाय्यक निवडणूक अधिकारी रामनिवास झवंर यांनी कळविले आहे. जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर,वरणगाव जामनेर येथे वादग्रस्त घटना घडली असून केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे व आ.चंद्कांत पाटील यांचे कार्यकर्ते आमणे सामणे भिडले होते तर जामनेर ला एका महिला मतदाराचे नावावर कोणी तरी मतदान करून आल्याने महिलेने संताप व्यक्त करीत प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत बोगस मतदान झाल्याचा आरोप केला आहे.राज्यातील 264 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदान झाले असून मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका अखेर आज किरकोळ घटना वगळता शांततेत पार पडल्या आहेत. यामध्ये एकूण 226 नगरपरिषद आणि 38 नगरपंचायतींसाठी मतदान सकाळी 7.30 वाजता सुरू झाले आहे. दरम्यान, 76 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 154 सदस्यपदांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. राजकीय पक्षांनी विजयासाठी कंबर कसली असून आता मतदारांचा कौल कोणाला मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार मार्क करण्याची व्यवस्था करण्यात आली होती.प्रभाग वाईज मतदान तक्ता पुढीलप्रमाणेचोपडा नगरपरिषद निवडणूक शेकडा ६७.९७ मतदान..डिसेंबर ०२, २०२५ चोपडा नगरपरिषद निवडणूक शेकडा ६७.९७ टक्के शांततेत मतदान.. मुक्ताईनगर व जामनेर येथे राडा.. वरणगाव दोन गटात शाब्दिक चकमक चोपडा दि.२( ज्ञानेश्वर बाविस्कर)चोपडा नगरपरिषद सन 2025 चे सार्वत्रिक निवडणूकीत आज दि.२डिसेंबर रोजी नगराध्यक्षपदासह १५ प्रभागात ३१नगरसेवक पदासाठी किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. सायंकाळच्या सुमारास मतदान वाढल्याने रात्री दहा सव्वा दहा वाजेपर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या . संपूर्ण शहर प्रभागात एकुण 45 हजार 311 मतदारांनी हक्क बजावला असून त्यात 22,819पुरुष मतदारांनी तर 22,490 महिला व इतर 2 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे असे चोपड्याचे एकुण शेकडा 67.97% मतदान झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मनिष गायकवाड व सहाय्यक निवडणूक अधिकारी रामनिवास झवंर यांनी कळविले आहे. जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर,वरणगाव जामनेर येथे वादग्रस्त घटना घडली असून केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे व आ.चंद्कांत पाटील यांचे कार्यकर्ते आमणे सामणे भिडले होते तर जामनेर ला एका महिला मतदाराचे नावावर कोणी तरी मतदान करून आल्याने महिलेने संताप व्यक्त करीत प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत बोगस मतदान झाल्याचा आरोप केला आहे.राज्यातील 264 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदान झाले असून मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका अखेर आज किरकोळ घटना वगळता शांततेत पार पडल्या आहेत. यामध्ये एकूण 226 नगरपरिषद आणि 38 नगरपंचायतींसाठी मतदान सकाळी 7.30 वाजता सुरू झाले आहे. दरम्यान, 76 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 154 सदस्यपदांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. राजकीय पक्षांनी विजयासाठी कंबर कसली असून आता मतदारांचा कौल कोणाला मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार मार्क करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रभाग वाईज मतदान झाले .
byमीडीया पोलीस टाईम
-
0