पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाची कामगिरी.. ‌‌. पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरण पथकाचे अंमलदार हे पोस्टे परिसरात.. ‌‌. दि. 29/12/2025 रोजी पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिर कडुन खात्रीशीर खबर मिळाली की, दिक्षीत उर्फ गुटली मिलींद भगत रा.संत तुकडोजी वार्ड हिंगणघाट हा त्याचे राहते घरी दारूसाठा बाळगुन चिल्लर दारुविक्री करणारे यांना त्याचे मोपेड गाडी एमएच 32 एआर 6917 ने दारूची वाहतुक सप्लाय करीत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहीती मा. पोलीस निरीक्षक अनिल राऊत सा. यांना देवून त्याचे आदेशाने पोस्टाँसह रवाना होवून सदर इसमांचे राहते घरांची कायदेशीर रित्या झडती घेतली असता घरझडतीत 1) 27 खरडयाचे खोक्यात देषी दारूच्या 90 मिलीच्या कोकंण अॅग्रो मरीन इंडस्ट्रिज प्रा लि कंपनीच्या प्रिमीयम नं 1 ज्यावर बॅच नं.76 नोव्हे. 2025 असलेला, प्रति खोक्यात 100 षिषा प्रमाणे 2700 षिषा, प्रत्येकी षिषी 120 रू प्रमाणे 3,24,000 रू. 2) एका चुंगडीत रॉकेट संत्रा कंपनीच्या देषी दारूच्या 90 मिलीच्या 200 षिषा ज्यावर बॅच नं.463 सप्टे. 2025 असलेला, प्रति षिषी 120 रू. प्रमाणे 24,000 रू. 3) दोन चुंगडयामधे रॉयल स्टॅग कंपनीच्या विदेषी दारूच्या 180 मिलीच्या 48 षिषा ज्यावर बॅच नं. 1070 असा असलेला, प्रति षिषी किमंत 350 रू प्रमाणे कि.16,800 रू 4) दारू वाहतुकी करीता वापरलेली एक होन्डा डि.ओ कंपनीची लाल पांढ-या रंगाची एमएच 32 एआर 6917 मोपेड गाडी कि.1,00,000 रू. असा एकुण जु.कि. 4,64,800 रू चा मुददेमाल अवैदयरित्या मिळुन आल्याने पंचासमक्ष मौक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर माल जप्त करून गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल साहेब, मा.अप्पर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक सा. व पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डीबी पथकाचे इन्चार्ज सपोनि पद्दमाकर मुंडे सा. यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात डि.बी. पथक पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पोहवा किशोर कडू, पोहवा जगदीश चव्हाण, पो.ना राजेश शेंडे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. मंगेश वाघमारे, पोशी रोहीत साठे यांनी केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास सपोनी पद्माकर मुंडे हे करीत आहे..

पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाची कामगिरी..                     ‌‌.                                              
Previous Post Next Post