देवलगाव व ताडबोरगांव येथील आठ किलो मीटर खडीकरण रस्त्याचा मा. संतोष भैय्या आंबेगावकर यांच्याहस्ते शुभारंभ. (*मानवत / प्रतिनिधी.)—————————मानवत तालूक्यातीलमौजे देवलगाव येथे परभणी लोक सभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार संजयजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिव सेनेचे यूवानेते संतोष भैय्या आंबेगावकर व सरपंच केशवराव अवचार यांच्या अथक प्रयत्नाने देवलगाव व ताडबोरगाव येथील पांदण रस्त्याचे उद्घाटन मानवत तालूका शिवसेना तालुकाप्रमुख माणिकराव काळे यांच्या हस्ते करण्यात आले. शेतरस्त्या अभावी गावातील व शिवारातील शेतकऱ्यांना नेहमीच येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन या शिवारातील शेतकऱ्यांनी शेतामध्ये पिकवलेला माल बाजार पेठेमध्ये नेण्यासाठी शेतकऱ्यांना शेत रस्त्याची खूप आवश्यकता होती. यावेळी शेतकरी संघटनेचे मधुकराव अवचार, उत्तमराव अवचार, परमेश्वरराव अवचार, नारायणराव अवचार, श्याम आवचार, पांडुरंगराव अवचार, अशोकराव अवचार चेरमन, अशोक अवचार, उद्धव अवचार, परमेश्वर अवचार, उद्धवराव अवचार चेरमन आल्हादास भाई, बबरभाई, नारायण अवचार आदीसह शेतकरी व गावकरी यांची या वेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती...

देवलगाव व ताडबोरगांव येथील आठ किलो मीटर खडीकरण रस्त्याचा मा. संतोष भैय्या आंबेगावकर यांच्याहस्ते शुभारंभ.                                                                              
Previous Post Next Post