जिओ मोबाईल कंपनी मस्त वापरकर्ते ग्राहक झाले त्रस्त संडे ला रेंज पुर्णपणे गायब.5G टॉवर ची नागरिकाकडून होत आहे मागणी.. (गिरड जिल्हा प्रतिनिधी)गिरड गावाची लोकसंख्या जवळपास १६ हजाराच्या घरात असुन एकूण अंदाजे घराची संख्या २५०० च्या जवळ आहेत तर प्रत्येक घरी किमान दोन तरी मोबाईल वापरकर्ते आहेत व एका मोबाईल चा खर्च महिन्याला किमान ३०० रुपये म्हणजे एका घरी ६०० रुपये महिन्याचा खर्च याचा अंदाज ताळेबंद काढल्यास मोबाईल सिम कंपनीला महिन्याला ३,०००,००० लाख रुपयाचा निधी जमा होतो.गिरड गाव हे पर्यटन असल्यामुळे येथे दर रविवारला हजारो लोकं इथे पर्यटनासाठी येत असतात त्यामुळे सिम चे युजर्स वाढत असल्याने रेंज पुर्ण पणे जाम होत असुन मोबाईल काम करणे बंद होते त्यामुळे साधा कॉल सुद्धा लागत नाही यामुळे आपत्कालीन परीस्तीती निर्माण झाल्यास संपर्क करणे अवघड होत आहे.गेल्या अनेक वर्षापासून गिरड व परिसरात सर्वच मोबाईल कंपन्यांचे टॉवर उभारले गेले. मात्र गावात टावर असतानाही नेटवर्क मिळत नसल्याने मोबाईल धारक ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी नेटवर्क मिळविण्यासाठी स्लॅपचा,झाडाचा किंवा एखाद्या उंच जागेचा आधार घ्यावा लागतो. तरीही नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहकांना पैसे देऊनही मनस्ताप सहन करावा लागत असल्याने मोबाईल सिम कंपनी मस्त वापरकर्ते त्रस्त म्हणण्याची वेळ आली आहे. परिसरात गेल्या अनेक वर्षापासून शासनाचे बीएसएनएल सह जिओ व वोडा-आयडिया,इर्टेल चे खासगी मोबाईल कंपन्यांचे भले मोठे व उंच टावर उभे केले गेले. मात्र कंपन्यांच्या थातूरमातूर व दुर्लक्षित कारभारामुळे ग्रामीण भागात उभारलेल्या टावरला नेटवर्क मिळत नसल्याने अनेक ग्राहक नेटवर्क मिळवण्यासाठी आपला मोबाईल नंबर पोर्ट करीत आहेत. परंतु ज्या मोबाईल कंपनीकडे नंबर पोर्ट केला त्या मोबाईल कंपनीचे सुद्धा नेटवर्क मिळत नसल्याने अनेक नागरिक बऱ्याच वेळा उंच झाडावर चढून नेटवर्क मिळवण्यासाठी जीवघेणा प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामतः शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यासह व्यापारी कर्मचारी व सर्व सामान्य मोबाईल ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत. संबंधित मोबाईल कंपन्यांची मोबाईल नेटवर्क मधील तांत्रिक बिघाड लवकरात लवकर दुरुस्त करून चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील मोबाईल ग्राहक करत आहे. शासकीय निमशासकीय कार्यालयामधील कर्मचारी महा-ई-सेवा केंद्र तसेच ऑनलाईन काम करणारे सर्व केंद्र चालक त्रस्त झाले आहेत. मोबाईल कंपन्यांचे अजिबातही नेटवर्क मिळत नसल्याने बाहेर गावावरून आलेल्या अनेक ग्राहकांना महा-ई-सेवा केंद्रामधून आल्या पावली काम न करता परत जावे लागते ही समस्या गेल्या अनेक वर्षापासून दररोजची व नेहमीचीच असल्याने ग्राहकासह केंद्र चालक सुद्धा त्रस्त झाले आहेत. अचानकच टॉवरला काही ना काही बिघाड येत असल्याने परिसरातील ग्राहक फारच कंटाळले आहे. सर्वच मोबाईल ग्राहक मोबाईल वरून आपली स्वतःची कामे सहज व सुलभ व्हावी म्हणून तात्काळ मोबाईल कंपनीचे महागडे रिचार्ज मारतात. मात्र रिचार्ज मारूनही बरेच वेळा फोन लागत नाही किंवा इतर ऑनलाईन कामे होत नसल्यामुळे सेवेत सुधारणा करून ग्राहकांना दर्जेदार सेवा द्यावी, अशी मागणी मोबाईल धारक करीत आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0