हिंगणघाट नगरपरिषदेत 62.2 टक्के मतदान; शांततेत पार पडली निवडणूक प्रक्रिया... हिंगणघाट नगर परिषद निवडणुकीसाठी दिनांक 2/12/2025 ला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत पार पडलेल्या मतदानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून तब्बल 62.2 टक्के मतदान नोंदले गेले. शहरात सकाळपासूनच निवडणूकमय वातावरणाची चाहूल लागली होती. अनेक केंद्रांवर लवकरच मतदारांच्या रांगा दिसू लागल्या.मतदानाचा तपशील पुरुष मतदार : 30,154स्त्री मतदार : 28,532इतर : 0एकूण मतदान : 58,686सकाळच्या सत्रात काही ठिकाणी मतदानाचा वेग संथ असला, तरी दुपारनंतर नागरिकांनी केंद्रांकडे मोठ्या संख्येने धाव घेतली. महिलांचाही लक्षणीय सहभाग दिसून आला. दिवसाच्या अखेरीस जवळपास 59 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.शांतता व अनुशासनात मतदाननिवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासन सतर्क होते. प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेशा सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या. दिवसभर शहरात शांतता व अनुशासनाचे वातावरण कायम राहिले.मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष येत्या २१ डिसेंबर रोजीच्या मतमोजणीकडे लागले आहे. कोणत्या पक्षाच्या हातात नगरपरिषदेची सत्ता जाणार, याबाबत शहरात चर्चांना जोर आला आहे.मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा
byमीडीया पोलीस टाईम
-
0