*भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन..* * उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर टाकला प्रकाश... *हिंगणघाट, दि. ६ डिसेंबरभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दि.६ रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. या दरम्यान उपस्थित मान्यवरांनी डॉ. आंबेडकर यांच्या बहुमुल्य अशा कार्याचा आढावा घेत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक तसेच राज्यघटना निर्मितीतील योगदानावर प्रकाश टाकला. उपरोक्त कार्यक्रमास भाजपाचे ज्येष्ठ नेते किशोर दिघे, भाजपा जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे, अमोल त्रिपाठी, अनिता मावळे, शारदा पटेल, विशाल मुटे, दिव्यकुमार बोरगमवार, रविकांत डोळसकर, देवदत्त ठाकरे, हरिभाऊ जीवतोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन..*     * उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर टाकला प्रकाश...                                                                           
Previous Post Next Post