अकोला लाडक्या बहिणीचा हक्क मिळून देण्यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करू आणि लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही ग्रामीण आणि शहरी भागाच्या महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी यामधील तांत्रिक बाबी बद्दल सरकार दरबारी प्रश्न उपस्थित करून लाडक्या बहिणींना न्याय मिळवून देऊ असे अभिवचन आमदार रणधीर सावरकर यांनी दिले आज महिला बालकल्याण अधिकारी कार्यालयात लाडक्या बहिणींनी हजारोच्या संख्येने आल्या ही हे माहिती मिळाल्याबरोबर सर्वसामान्यांच्या संवेदना जाणून घेणारे तसेच सतत 18 तास जनतेच्या समस्या निराकरण करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांना तात्काळ महिला बालकल्याण अधिकारी गिरीश पुसतकर यांच्या कार्यालयात आले. त्यांनी जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून महिलांचे लाडक्या बहिणीचे पैसे चुकीच्या केवायसी मुळे बंद झाले हे लक्षात आले.लाडक्या बहिणीच्या भावना तसेच अधिकाऱ्यांशी अडचण यासंदर्भात माहिती घेऊन त्यांनी सरकार दरबारी हा प्रश्न मांडण्याचा अभिवचन दिला तसेच केवायसी करताना विचारलेले प्रश्न महिलांना न समजल्यामुळे व तांत्रिक चुकीमुळे केवायसी चुकीची झाल्या ही बाब आमदार सावरकर यांच्या लक्षात आले त्यांनी सर्व महिलांना व सोबत आलेल्या पुरुष मंडळींना आस्वस्थ केले की शासन दरबारी आपला प्रश्न मांडून केवायसी दुरुस्त करण्याचे ऑप्शन सुरू करण्याच्या बाबत शासन दरबारी पाठपुरावा करेल व माझ्या लाडक्या बहिणीचे हक्काचे पैसे मी बंद होऊ देणार नाही त्यांच्यासोबत अंबादास उमाळे विठ्ठल चतरकर राजेश बेले अनिल गावंडे वैभव माहुरे नारायण बोर्डे अंकुश इंगळे राजेश ठाकरे आधी उपस्थित होतेप्रतिनिधि रामचंद्र नावकार
byमीडीया पोलीस टाईम
-
0