राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मार्गदर्शन कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न., (प्रतिनिधि: यासीन मलक उमरी (रोड), ता. केळापूर, ) जिल्हा यवतमाळ येथील श्री गाडगे महाराज आश्रम शाळेत बोरखेडी-वडनेर-केलापूर (BWK) प्रोजेक्ट, NH-44 अंतर्गत राष्ट्रीय राजमार्ग इन्फ्रा ट्रस्ट (NHIT), केळापूर शाखेद्वारे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना २०२६ (१ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६) च्या उद्देशाने रस्ता अपघात नियंत्रणासाठी आयोजित कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली.या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना वाहतूक नियम, "नियम पाळा, अपघात टाळा" ही संकल्पना प्रोजेक्टरद्वारे सखोलपणे समजावली गेली. NHIT केळापूर प्रोजेक्टचे समन्वयक श्री. नरेश वड्डेट्टवार, श्री. बाळा गणेश, श्री. नीरज सर, श्री. पंकज हिंगे यांनी रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली तसेच ८वी, ९वी आणि ११वी वर्गाच्या विद्यार्थ्यांनी नाटकाच्या माध्यमातून वाहतूक नियम पालनाचे प्रत्यक्ष प्रदर्शन करून अपघात टाळण्याचे महत्त्व दाखवले.चित्रकला स्पर्धा आणि नाटकातील सहभागी विद्यार्थ्यांना NHIT केळापूर प्रोजेक्टतर्फे बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास श्री. गाडगे महाराज मिशन मुंबईचे सचिव व उमरी शाखेचे संचालक डॉ. सचिन घोंगडे, प्राचार्य श्री. उमेश दळवी, मुख्याध्यापक श्री. रमेश आत्राम, NHIT चे श्री. भानु प्रताप सिंह, श्री. प्रवीण शर्मा, श्री. अन्वर, श्री. ऋषिकेश आनंद, श्री. मुनेश वर्मा तसेच सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.डॉ. सचिन घोंगडे यांनी मनोगतात NHIT केळापूर प्रोजेक्टचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. नीरज सर यांनी केले तर सूत्रसंचालन श्री. शंकर चोपडे यांनी केले.
byमीडीया पोलीस टाईम
-
0