देऊळगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा (अकोला जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) प्रजासत्ताक दिनी आज 26 जानेवारी 2026 रोजी स्वतंत्र भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतात आनंदाने साजरा. करण्यात आला त्यानिमित्ताने. पुंडलिक महाराज विद्यालयांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री पुंडलिक महाराज विद्यालय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रल्हाद रावजी बोचरे साहेब होते तसेच ज्येष्ठ समाजसेवक श्री पांडुरंग जी गोळे यांच्या हस्ते विद्यालयातील ध्वजारोहण संपन्न झाले याप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले तसेच याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा पोलीस टाईम मीडियाचे अकोला जिल्हा प्रतिनिधी संतोष भाऊ उपर्वट यांच्या हस्ते महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच बक्षीस वितरण सुद्धा.संतोष उपर्वट यांच्या हस्ते करण्यात आले क्रीडा स्पर्धे अंतर्गत प्रमाणपत्राचे वितरण देऊळगाव मधील मान्यवरांच्या हस्ते सुद्धा.करण्यात आले 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी रोजी शाळा महाविद्यालय तंबाखूमुक्त गाव.परिसर असा संकल्प करण्यात आला. त्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहेसंपूर्ण कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयाचे शिक्षक श्री सांगळे सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरणसे सरांनी केले संपूर्ण कार्यक्रम मुख्याध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली पार पडला तसेच देऊळगाव मधील प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक मान्यवर मंडळी.मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते आणि शालेय पोषण आहार मदतनीस सुद्धा या कार्यक्रमांमध्ये उपस्थित होत्या अशा रीतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला
byमीडीया पोलीस टाईम
-
0